एक्स्प्लोर

पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर

पुण्यातील काळेपडळ भागातील परिसरात आज सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली, अनुष्का चौगुले (18 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पुणे : शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुण्य नगरीत (Pune) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नव्या पिढीकडे, झेन झी तरुणाईकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेकदा तरुणाईकडून किरकोळ कारणावरुन आपलं जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटनाही घडत आहेत. आपल्या कुटुंबीयांचा विचार न करता, आई-वडिलांची काळजी न करत हे टोकाचे पाऊल उचलले जाते. आता, पुण्यात 18 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर उघडकीस आली आहे. नीट (NEET) परीक्षेतील कमी गुणामुळे तिने हा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

पुण्यातील काळेपडळ भागातील परिसरात आज सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली, अनुष्का चौगुले (18 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अनुष्काच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. कारण, नीट परिक्षेचा निकाल लागल्यानंतर काही तासांतच तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीटच्या पुनर्परिक्षेचा निकाल 16 जून रोजी देशभरात जाहीर झाला. त्यानंतर, अनेकांनी आपले गुण शेअर करत आनंद साजरा केला. मात्र, काहींना गुण कमी मिळाल्याने दु:ख झाल्यचंही पाहायला मिळालं. अनुष्कानेही नीट परीक्षा दिली होती, अशी माहिती आहे.

तरुणी काल रात्री नेहमीप्रमाणे आपल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेली होती. मात्र, आज सकाळी बराच वेळ झाला तरी ती रुममधून बाहेर न आल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला आवाज दिला. तरीही घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा

नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Gunda Act: कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
Akola Crime News: भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू
भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Embed widget