एक्स्प्लोर

महिलांचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर शेअर केले; परभणीच्या जिंतूरमधील धक्कादायक प्रकार 

Parbhani : परभणीच्या जिंतूरमध्ये मागच्या काही दिवसांपासून महिलांचे फोटो सोशल माध्यमांमधून जमा करून त्याला अश्लीलतेची जोड देत ते पुन्हा सोशल माध्यमांमध्ये प्रसारित करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

परभणी : सोशल मीडियाचा जेवढ्या चांगल्या गोष्टीसाठी वापर होतो त्याही पेक्षा वाईट गोष्टींसाठी केला जातोय हे वारंवार दिसून येतंय. महिलांच्या बाबतीत खरच सोशल माध्यमं सुरक्षित आहेत का ? असा प्रश्नही उपस्थित होतोय. त्याचे कारण म्हणजे सोशल माध्यमांमधील महिलांचे फोटो जमा करून त्यांना मॉर्फ करत परदेशी नंबरवरून ते वाईट पद्धतीने शेअर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

परभणीच्या जिंतूरमध्ये मागच्या काही दिवसांपासून महिलांचे फोटो सोशल माध्यमांमधून जमा करून त्याला अश्लीलतेची जोड देत ते पुन्हा सोशल माध्यमांमध्ये प्रसारित करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. +48 या आंतरराष्ट्रीय कोड नंबरवरून अशा प्रकाराने मॉर्फ केलेले फोटो  व्हाट्सअ‍ॅपवर पाठवले जात आहेत. अनेक महिलांसोबत हा प्रकार घडल्याने शेवटी याबाबत जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. एका तक्रारीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार करत आहेत. 

पोलिसांकडून आवाहन

व्हाट्सअ‍ॅप वापरताना विशेषतः महिलांनी योग्य व्यक्तीला आपला नंबर देतोय का? तो सेव करणे आवश्यक आहे का? फोटो, व्हिडीओ शेअर करताना कोण कोण ते पाहतय हे व्यवस्थित तपासले पाहिजे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सारख्या सोशल माध्यमावर कुणालाही ऍड करताना तो व्यक्ती आपल्या परिचयाचा आहे का? हे पाहून आपल्या मोबाईलची प्रायव्हेसी सेटिंग करून घेणे गरजेचे. प्रोफाइल अनोळखी व्यक्तीसाठी लॉक करायला हवे, अशा अनेक सुरक्षित बाबींचा विचार करूनच सोशल माध्यम हाताळायला हवे, असे आवाहान पोलिसांकडून करण्यात आलंय.  

लवकरच याचा छडा लावला जाईल

या प्रकरणात आम्ही एक जणाची फिर्याद दाखल करून घेतली आहे. शिवाय काही जणांचे जवाब घेतले आहेत. आमच्या सायबर सेलला ही या नंबर बाबत माहिती देण्यात आली असून सर्व स्तरावर आम्ही तपास करत आहोत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावू अशी माहिती या प्रकरणातील तपास अधिकारी तथा जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय. 

सोशल मीडिया हाळताना काळजी घ्यावी
व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, स्नॅपचॅट यासह इंस्टाग्रामची सध्या जोरदार चलती आहे. आज बहुतांश नागरिक सोशल मीडियाचा वापर करतात. स्वतःचे, मित्र मैत्रिणीं बरोबर, कुटुंबाबरोबरचे, ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबतचे अनेक फोटो आपण या माध्यमांमध्ये टाकत असतो. काही महत्वाचे निर्णय, घोषणा आदी देखील याच माध्यमातून केल्या जातात. महिलांच्या बाबतीत यातील अनेक माध्यमांनी सुरक्षितपणे आपले अकाउंट वापरण्याची सोय केलेली आहे. मात्र तिथून देखील कोण तुमचे फोटो,व्हिडीओ काढून त्याला छेडछाड करून चुकीच्या पद्धतीने पुन्हा ते याच माध्यमांमध्ये प्रसारित करेल याचा आता नेम राहिला नाही. त्यामुळे महिलांनी काळजी घेतली पाहिजे, असे पोलिसांचे मत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget