एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Police Threatening Call : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, बॉम्ब हल्ल्याची धमकी; अवघ्या काही तासांत आरोपीला अटक

Mumbai Police Receive Threat Call : मुंबईवर (Mumbai) दहशतवादी हल्ल्याचं सावट (Terrorist Attack) असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलीस (Mumbai Police) कंट्रोलला आला होता.

Mumbai Police Receive Threat Call : मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट (Terrorist Attack) असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. यामुळे यंत्रणांनी अलर्ट मोडवर जाऊस तपास करत फोन करुन धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला (Mumbai Police Control Room) धमकीचा फोन आला होता. यानंतर हा फोन आणि या व्यक्तीचा शोध सुरु झाला. दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता, फोन करणाऱ्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे निष्पन्न झालं. कॉल करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीच्या कॉल प्रकरणी नागेंद्र ज्ञानेंद्र शुक्ला या 30 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वनराई पोलिसांनी दिंडोशी येथून संबंधित आरोपीला अटक केली आहे. या व्यक्तीने शुक्रवारी रात्री उशीरा मुंबई नियंत्रण कक्षाला कॉल केला होता. या व्यक्तीने पोलिसांना कॉल करत बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली होती. त्याने फोनवर सांगितलं होतं की, पाकिस्तानमधून आलो आहोत सांभाळून रहा. तुमच्या बाजूला दोन-तीन तासात बॉम्ब फुटेल, अशी धमकी कॉलरने दिली होती. त्याने कॉल दरम्यान सीमा हैदरचा देखील उल्लेख केला होता. आरोपीने दारूच्या नशेत धमकी दिली होती.

पोलिसांच्या अनेक वेळा धमकीचे फोन

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला याआधीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. अनेकदा पोलिसांना असे फेक कॉल येतात. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. यानंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शोधमोहीम राबवली असता, धमकीचा फोन अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे नावाच्या व्यक्तीने केल्याचं आढळून आलं.

'मुंबईत काही लोक बॉम्ब बनवत आहेत...'

याआधीही 18 सप्टेंबरला मुंबई पोलीस (Mumbai Police) कंट्रोलला धमकीचा फोन (Threat Call) आला होता. मुंबईत काही लोक बॉम्ब बनवत असून आणि हल्ल्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती एका निनावी व्यक्तीने फोन करुन कंट्रोल रूमला (Mumbai Police Control Room) दिली होती. यानंतर यंत्रणा हा अलर्ट मोडवर आल्या (Mumbai Police Alert) आणि या फोननंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला आणिन करणाऱ्याला अटक केलं. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Mumbai Police : मुंबई पोलिसांकडून तुम्हालाही फेसबुकवरून आली फ्रेंड रिक्वेस्ट? सावध व्हा, ही बातमी वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget