Parbhani Crime News : परभणीत दहा वर्षीय चिमुरडीवर दोघांकडून अत्याचार, आरोपी फरार
दहा वर्षीय चिमूरडीवर दोन जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना परभणीच्या (Parbhani ) सेलूत घडली आहे.
Parbhani Crime News : दहा वर्षीय चिमूरडीवर दोन जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना परभणीच्या (Parbhani ) सेलूत घडली आहे. अंगणात भावासोबत खेळत असलेल्या दहा वर्षीय चिमुरडीला भावासमवेत दुचाकीवर घेऊन जात अत्याचार केला आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
परभणीच्या सेलू शहरात ही घटना घडली आहे. घराच्या अंगणात 10 वर्षाची चिमुकली आपल्या 10 वर्षीय मावस भावासोबत खेळत होती. यावेळी दोन अज्ञात आरोपी त्या दोघांनाही दुचाकीवरुन घेऊन गेले. त्यानंतर सदर मुलीच्या भावाला कौसडी फाट्यावर सोडून देत मुलीला कोक शिवारात घेऊन जात तिथे तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने काल रात्री उशिरा सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात दोन आरोपीं विरोधात सेलू पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, फरार आरोपींचा पोलीस शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान घटना घडल्यानंतर पोलीस अधिक्षक जयंत मिना, अप्पर पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार यांनी रात्री उशिरा सेलुसह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सध्या या प्रकरणाचा तपास सेलू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पूरी या करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Crime News : धक्कादायक! चॉकलेटचे आमिष दाखवून अहमदनगरमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
- चर्चमध्ये तीन मुलींवर लैंगिक अत्याचार, नवी मुंबईच्या सीवूडमधील धक्कादायक प्रकार; पास्टरवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल