(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parambir Singh : परमबीर सिंहांचे अखेर निलंबन; खंडणी, अॅट्रोसिटीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने कारवाई
Parambir Singh Suspension : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अखेर निलंबन झाले आहे. खंडणी, अॅट्रोसिटीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांचे अखेर निलंबन करण्यात आलं आहे. खंडणी, अॅट्रोसिटीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
परमबीर यांच्या निलंबना संदर्भातील फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृहविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय एका खात्याचे प्रमुख असूनही ते वेळेत सेवेत रुजू झाले नाहीत, असा ठपकाही ठेवण्यात आलाय.
काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची तब्बल एका तासासाठी भेट झाली होती. यासंदर्भात बोलताना या भेटीची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.
चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. यावेळी चांदीवाल आयोगानं परमबीर सिंहांना बजावलेलं जामीनपात्र वॉरंट रद्द केलं आहे. परंतु, आयोगासमोर हजर राहण्यापूर्वी परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये तब्बल एका तासासाठी चर्चा झाली. पण त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं ते कळू शकलं नाही.
सचिन वाझे हा वर्दीतला गुंड असून परमबीर सिंह पोलीस दलावरचा डाग असल्याचा घणाघाती आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ एफ रिबेरो यांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
- Julio Ribeiro : सचिन वाझे वर्दीतला गुंड, परमबीर पोलीस दलावरचा डाग; माजी पोलीस आयुक्त रिबेरोंचा हल्लाबोल
- Parambir singh : परमबीर यांच्यासह फरार घोषित केलेल्या विनय सिंहला हायकोर्टाचा मोठा दिलासा
- भेटीगाठींच्या सत्रामुळे वाद टाळण्यासाठी वाझे आणि देशमुखांची वेगवेगळ्या दिवशी हजेरी, चांदीवाल आयोगाचा निर्णय