एक्स्प्लोर

Pankaj Deshmukh : पंकज देशमुख हत्या प्रकरणी पत्नीने संशयितांची नावे दिली, तीन पोलिसांसह सहा जणांवर सुनीता देशमुखांचा संशय

Pankaj Deshmukh Murder Case : आपल्याला भाजप कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असून मुलाबाळांना काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा सुनीता देशमुख यांनी दिला आहे.

बुलढाणा : जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांचा ड्रायव्हर पंकज देशमुख याच्या हत्येप्रकरणी पत्नी सुनीता देशमुखांनी तीन संशयितांची नावे पोलीस अधीक्षकांना दिली. त्यामध्ये आमदार संजय कुटे यांचा स्वीय सहाय्यक निलेश वर्माचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे या हत्या प्रकरणातील संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलिसांची यादीही सुनीता देशमुखांनी पोलीस अधीक्षकांना दिली. यावर आता पोलीस अधीक्षक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय असलेले ड्रायव्हर पंकज देशमुख यांचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या मृतदेहाचं मृतकाच्या नातेवाईकांना विश्वासात न घेता अकोला येथील रुग्णालयात शवविच्छेदन केलं. मात्र पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने केला. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी सुनीता देशमुख यांनी लावून धरली आहे.

तीन संशयितांची नावे दिली

सुनीता देशमुख यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन या प्रकरणातील तीन संशयतांची नावे दिली. या प्रकरणात संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावेही त्यांनी अधीक्षकांकडे दिली आहेत. आता पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल.

Pankaj Deshmukh Murder Case : पंकज देशमुख हत्या प्रकरणातील संशयितांची नावे

1. निलेश शर्मा ( आमदार संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक)

2. गजानन सरोदे ( आमदार संजय कुटे यांच निकटवर्तीय नातेवाईक)

3. परीक्षित ठाकरे ( कंत्राटदार )

या संपूर्ण प्रकरणात संशयितांना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही नावे सुनीता देशमुख यांनी दिली. ती खालीलप्रमाणे,

1. श्रीकांत निचळ ( पोलीस निरीक्षक, जळगाव जामोद)

2. अमोल पंडित ( पोलीस उपनिरीक्षक)

3. सचिन राजपूत ( गोपनीय विभाग कर्मचारी )

सुनिता देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे आणि जाहीर केलेल्या संशयितांच्या नावामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सीआयडी तपासाची मागणी अजूनही मान्य नाही

मयत पंकज देशमुखांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, "या प्रकरणाचा सीआयडी तपास करावा अशी मागणी आपण सातत्याने करत आहोत. या संबंधित आठ-नऊ निवेदन देऊनही त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. या हत्येला तीन महिने होऊन गेले. पण पोलिसांनी आतापर्यंत काय तपास केला हे जाहीर केलं नाही."

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Embed widget