एक्स्प्लोर

धक्कादायक! घरातील खुंटीला स्वेटरची दोरी अडकून 9 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

सांगोला तालुक्यातील अचकदाणी येथे स्वेटरची दोरी खुंटीत अडकून फास बसल्यानं नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पंढरपूर : घरात खेळत असताना अचानक अंगातील स्वेटरची दोरी खुंटीत अडकून फास बसल्यानं नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सांगोला तालुक्यातील अचकदाणीजवळ असलेल्या माळीवस्ती येथील नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे.

सांगोला तालुक्यातील अचकदाणी जवळील माळीवस्ती येथे नागन्नाथ सिताराम शेंडे हे पत्नी, आई, एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यासमवेत राहतात. आर्थिक स्थिती हलाखीची असल्यानं नागन्नाथ शेंडे आणि त्यांची पत्नी मोलमजुरी करून उपजीविका करतात. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे सिमेंटच्या चौकटी बनवणाऱ्या कारखान्यात ते अनेक वर्ष काम करत होते. लॉकडाऊन नंतर नोकरी गेल्यानं त्यांनी परिसरातच मोलमजूरी सुरु केली होती. आज नेहमीप्रमाणे दोघेही पती-पत्नी सकाळी लवकर कामासाठी घराबाहेर पडले होते. त्यांचा नऊ वर्षाचा सोहम नागन्नाथ शेंडे हा मुलगा आणि त्याची वयस्कर आजी असे दोघेच घरी होते.

थंडीचे दिवस असल्यानं सोहम यानं अंगामध्ये स्वेटर घातलेला होता. घरातील पलंगाच्या वरील बाजूस असलेल्या मोठ्या खुंटीशी तो खेळत होता. खेळताना अचानक स्वेटर मधील दोरी खुंटीमध्ये अडकली आणि त्याला फास लागला. जोरात फास लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. शेजारील मित्र त्यास खेळायला बोलवण्यासाठी आले, तेव्हा हा प्रकार उघडकीला आला. शेजारील शेतात काम करणारी आई धावत त्या ठिकाणी आली. तिने पोटच्या गोळ्याला त्या अवस्थेत पाहून हंबरडा फोडला. आईच्या आक्रोशाने जमलेल्या लोकांच्याही डोळ्यात अश्रू आले. सोहम शेंडे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरातवस्ती चिकमहूद या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होता. सोहम हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget