एक्स्प्लोर

OLA: 28 पानी चिठ्ठी लिहित OLA च्या कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, सीईओंवर खळबळजनक आरोप; FIR दाखल, नेमकं काय घडलं?

OLA: देशातील आघाडीच्या स्टार्टअप्सपैकी एक असलेल्या ओला इलेक्ट्रिक कंपनीतील 38 वर्षीय अभियंत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.

OLA: देशातील आघाडीच्या स्टार्टअप्सपैकी एक असलेल्या ओला (OLA) इलेक्ट्रिक कंपनीतील 38 वर्षीय अभियंत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या कर्मचाऱ्याने लिहिलेल्या 28 पानी सुसाइड नोटमध्ये कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल (OLA CEO Bhavish Aggrawal) यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळ, पगार नाकारणे, आणि सततच्या दबावामुळे आयुष्य उध्वस्त झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मृत अभियंत्याचे नाव अरविंद (पूर्ण नाव गोपनीय) असून ते ओला इलेक्ट्रिकमध्ये होमोलॉगेशन इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. 2022 पासून कंपनीत नोकरी करत असलेल्या अरविंद यांनी 28 सप्टेंबर रोजी बंगळुरूतील चिक्कलसंद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. विष घेतल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

OLA: सुसाइड नोटमधील गंभीर आरोप

अरविंद यांच्या आत्महत्येनंतर दोन दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांना एक 28 पानी सुसाइड नोट आढळून आली. या सुसाइड नोटमध्ये त्यांनी ओला इलेक्ट्रिकमधील कामाच्या तणावाचे, वरिष्ठांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाचे आणि वेतन थकवण्याच्या प्रकारांचे सविस्तर वर्णन केले आहे. विशेषतः कंपनीचे CEO भाविश अग्रवाल यांच्यासह सुब्रत कुमार दास आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे नमूद करून, त्यांनीच मानसिक छळ केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

OLA: मृत्यूनंतर खात्यात जमा झाले 17.46 लाख

अरविंद यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्यांच्या बँक खात्यात 17,46,31 इतकी मोठी रक्कम जमा करण्यात आली. या व्यवहाराबाबत त्यांच्या भावाने कंपनीकडे विचारणा केली असता, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप आहे. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने अरविंदच्या भावाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

OLA CEO Bhavish Aggrawal: CEO सह इतरांविरोधात गुन्हा दाखल

तक्रारीच्या आधारे बंगळुरू पोलिसांनी ओला इलेक्ट्रिकचे CEO भाविश अग्रवाल, वरिष्ठ अधिकारी सुब्रत कुमार दास, आणि इतर संबंधितांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मृताच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

OLA : कंपनीची प्रतिक्रिया

या घटनेनंतर ओला इलेक्ट्रिकने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात कंपनीने म्हटले आहे की, "आमचे कर्मचारी अरविंद यांच्या आकस्मिक मृत्यूने आम्हाला तीव्र दुःख झाले आहे. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. अरविंद मागील साडे तीन वर्षांपासून आमच्यासोबत कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कधीही कोणतीही औपचारिक तक्रार केली नव्हती. तरीही या प्रकरणात आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, " असे, म्हटले आहे. तसेच, मात्र कंपनीचे मालक आणि इतर अधिकाऱ्यांवर झालेल्या FIR ला आम्ही कर्नाटक हायकोर्टात आव्हान देऊ असं कंपनीने म्हटलं आहे.

आणखी वाचा 

Vashi Fire news: बिछान्याला खिळलेल्या आजीबाईंना उठताच आलं नाही, खोलीतील धुराने श्वास गुदमरला अन्... वाशीतील अग्नितांडवात चौघांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget