Nikki Murder Case Greater Noida: पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीचा पोलिसांकडून एन्काऊंटर; वैद्यकीय तपासणीवेळी थरारक घटना, नेमकं काय घडलं?
Nikki Murder Case Greater Noida: ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निक्की हत्या प्रकरणातील आरोपी आणि तिचा पती विपिन याचा दिल्ली पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला.

Nikki Murder Case Greater Noida: ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक घटना (Nikki Murder Case Greater Noida) समोर आली आहे. निक्की हत्या प्रकरणातील आरोपी आणि तिचा पती विपिन याचा दिल्ली पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. आरोपी विपिन कोठडीतून पळून जाण्यासाठी प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांनी विपिनच्या पायावर गोळी झाडली. पोलिसांनी गोळी झाडताच विपिन जखमी झाला आणि खाली कोसळला. त्यानंतर पोलिसांकडून विपिनला अटक करण्यात आली.
#WATCH | Greater Noida: Accused of murdering his wife Nikki over dowry demands, Vipin Bhati says, "... I have no remorse. I haven't killed her. She died on her own. Husband and wife often have fights, it is very common..." pic.twitter.com/YrPFaYARuY
— ANI (@ANI) August 24, 2025
पोलीस विपिनला मेडिकलसाठी घेऊन जात होते. त्यानंतर विपिनने रस्त्यात गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांचे शस्त्रही हिसकावून घेतले. यानंतर पोलिसांनी विपिनच्या दिशेने गोळी झाडली, ती त्याच्या पायावर लागली आणि विपिन खाली कोसळला. दरम्यान, 36 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी विपिनने त्याच्या आई-वडिलांच्या मदतीने पत्नी निक्कीला जिवंत जाळलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
विपिनने त्याच्या आईसह 21 ऑगस्ट रोजी त्याची पत्नी निक्कीला जिवंत जाळले होते. या प्रकरणाबाबत निकीची बहीण कांचन हिने तक्रार दाखल केली होती, त्यानंतर निकीच्या कुटुंबाने कसना पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले आणि न्यायाची मागणी केली. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आहे. निकीचा पती विपिन व्यतिरिक्त पोलिसांनी तिचा मेहुणा, सासू आणि सासरा यांनाही मुख्य आरोपी बनवले आहे. विपिनने त्याच्या निष्पाप मुलासमोर पत्नी निकीला जाळून मारले होते. त्यानंतर तो फरार झाला होता. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला सुरुवातीला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथून तिला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, पण वाटेतच निक्कीचा मृत्यू झाला.
पप्पांनी आईला लायटरने जाळले-
निक्की आणि विपिनचा विवाह डिसेंबर 2016 रोजी झाला होता. निक्कीला तिच्या घरात मारहाण करून जाळण्याचा व्हिडीओही समोर आला आहे. या घटनेनंतर निक्कीच्या लहान मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये पप्पांनी आईला लायटरने जाळले, असं निक्कीचा मुलगा बोलताना दिसला.
























