Nerul Murder : नेरूळ रिअल इस्टेट एजंट्सच्या हत्याप्रकरणात 5 आरोपींना अटक, जमिनीच्या आर्थिक वादातून हत्या
Navi Mumbai Murder : रिअल इस्टेट एजंट आमिर खानजादा आणि सुमित जैन यांची 21 रोजी हत्या झाली होती. जमिनीच्या व्यवहारात आर्थिक वाद झाल्यानंतर ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
Navi Mumbai Murder : नवी मुंबईतल्या नेरूळ येथील दोन रिअल इस्टेट एजंट्सच्या हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या खरेदीविक्रीच्या व्यवहारात झालेल्या आर्थिक वादातून या हत्या झाल्याचा गौप्यस्फोट नवी मुंबई पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात विठ्ठल बबन नाकाडे, जयसिंग उर्फ राजा मधु मुदलीयार, आनंद उर्फ अॅण्ड्री राजन कूज, वीरेंद्र उर्फ गोया भरत कदम आणि अंकुश उर्फ अंक्या प्रकाश सितापुरे या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
नेरुळचे रहिवासी असलेले रिअल इस्टेट एजंट आमिर खानजादा आणि सुमित जैन हे 21 ऑगस्ट रोजी एका मालमत्तेच्या व्यवहारासाठी आपल्या गाडीतून निघाले होते. पण ते घरी परतले नाहीत. त्यामुळं ते दोघंही बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या तपासात सुमित जैन यांचा मृतदेह पेणमध्ये, तर आमिर खानजादा यांचा मृतदेह कर्नाळा अभयारण्यात मिळाला होता. जमिनीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
तरुणीचा निर्घृण खून, पुण्यातील धक्कादायक घटना
पुण्यातील खराडी भागात एका अज्ञात तरूणीचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खराडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. खून झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे 18 ते 30 वर्षे इतके आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. या परिसराच्या जवळच असलेल्या नदीपात्रामध्ये एका तरूणीचे हात, पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धड असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आता हा सर्व प्रकार उघडकीस आला. मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही.
ही बातमी वाचा: