एक्स्प्लोर

NEET Exam Paper Leak: अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?

NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी नाशिकचा शुभम खैरनार याच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासे होत आहेत.

NEET Exam Paper Leak: देशभरातील तब्बल 22 लाख 29 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणाचे (NEET Exam Paper Leak) धागेदोरे आता अधिक गडद आणि धक्कादायक वळणावर पोहोचले आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी नाशिकचा शुभम खैरनार (Shubham Khairnar) याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणि नाशिक गुन्हे शाखेने नाट्यमयरीत्या अटक केल्यानंतर त्याच्या गुन्हेगारीची 'मोडस ऑपरेंडी' (काम करण्याची पद्धत) समोर आली आहे. पैशांच्या जोरावर आपल्या मुलांना डॉक्टर बनवू इच्छिणाऱ्या बड्या धेंडांना गाठून शुभम खैरनार लाखो रुपयांची डील करायचा, अशी माहिती सूत्रांकडून उघड झाली आहे.

NEET Exam Paper Leak: काय होती शुभम खैरनारची 'मोडस ऑपरेंडी'?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुभम खैरनारचे मुख्य टार्गेट हे "अभ्यासात सुमार (ढ) मात्र आर्थिकदृष्ट्या अत्यंत श्रीमंत" असणारे विद्यार्थी असायचे. ज्या पालकांकडे अफाट पैसा आहे आणि ज्यांना आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत 'डॉक्टर' बनवायचे आहे, अशा बड्या धेंडांचा शोध शुभम घ्यायचा.

NEET Exam Paper Leak: कोचिंग क्लासेसच्या संचालकांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात

पालकांना परीक्षेआधीच मूळ प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवून तो 15 ते 20 लाख रुपयांची डील करत होता. 1 मे रोजीच हा पेपर फुटला होता, असा संशय आहे. शुभमने हा पेपर 10 लाख रुपयांना विकत घेतला आणि पुढे तो श्रीमंत विद्यार्थ्यांना 15 लाख रुपयांना विकला. या व्यवहारानंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रामवर लीक झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. या हायटेक रॅकेटमध्ये राज्यातील काही नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात असून, अनेक मोठे चेहरे सीबीआयच्या रडारवर आहेत.

NEET Exam Paper Leak: ओळख लपवण्यासाठी केलं टक्कल; पोलिसांचा थरारक सापळा

दरम्यान, शुभम खैरनार हा मूळचा नांदगावचा रहिवासी असून तो नाशिकमध्ये बी.ए.एम.एस. (BAMS) च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. राजस्थान सीबीआय आणि पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ने कारवाई केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी शुभमने चक्क आपले संपूर्ण केस कापून टक्कल केले होते आणि कपडेही बदलले होते. तो देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी रस्त्यातच सापळा रचला. नवीन 'लूक'मुळे सुरुवातीला तो ओळखू आला नाही, मात्र पोलीस अंमलदारांनी त्याला शिताफीने ओळखले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.  

NEET Exam Paper Leak: कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू

शुभमच्या कार्यालयात आणि घरी नेमके कोण-कोण लोक भेटायला येत होते, याचा सुगावा लावण्यासाठी सीबीआय आता त्याच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची सखोल तपासणी करत आहे. याशिवाय, गेल्या काही महिन्यांपासून शुभम खैरनार याच्याशी प्रत्यक्ष सोशल मीडिया आणि दूरध्वनीद्वारे सातत्याने किंवा संशयास्पदरित्या संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचा तपास सुरू करण्यात आला आहे.

NEET Exam Paper Leak: 21 जून रोजी होणार 'नीट'ची पुनर्परीक्षा

3 मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीमुळे अखेर रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आता या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून, 21 जून रोजी नीटची पुनर्परीक्षा (Re-Exam) घेतली जाणार आहे. पेपरफुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे.

आणखी वाचा

Amit Thackeray on NEET Exam Paper Leak: ज्यांच्याकडे पैसा आहे तेच डॉक्टर बनणार का? नीट पेपरफुटी प्रकरणावर अमित ठाकरेंचा संतप्त सवाल; म्हणाले, 'शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget