एक्स्प्लोर

NEET Exam Paper Leak: मोठी बातमी: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई, खासगी क्लास चालकाच्या घरावर छापा

NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणातील लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढवल्याचे पाहायला मिळत आहे.

NEET Exam Paper Leak: देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी (NEET Exam Paper Leak) प्रकरणाचे धागेदोरे पुन्हा एकदा लातूरमध्ये शोधले जात आहेत. सीबीआयच्या (CBI) पथकाने आज पहाटेच लातूर शहरातील सुतमील परिसरात एका खासगी ट्युशन चालकाच्या घरावर छापा टाकला असून, गेल्या अनेक तासांपासून तपासणी सुरू आहे. या कारवाईमुळे शिक्षण पंढरी मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये (Latur) पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

NEET Exam Paper Leak: पहाटे 6 वाजल्यापासून कारवाई सुरू

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे पथक आज पहाटेच संबंधित ट्युशन चालकाच्या निवासस्थानी धडकले. सकाळी सहा वाजल्यापासून घराची आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली जात आहे. यामध्ये संशयित ट्युशन चालकाचे मोबाईल फोन, संगणक हार्ड डिस्क आणि विद्यार्थ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या नोंदींची पडताळणी केली जात असल्याचे समजते. 

NEET Exam Paper Leak: सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी सीबीआयच्या ताब्यात 

तर लातूरमधील सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी लातूरमध्ये झालेल्या तपास आणि चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली. कुलकर्णी हे चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. NEET पेपर सेट करण्याच्या समितीत त्यांचा सहभाग असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या संपर्कात ते असल्याचेही समोर आले असून, त्याच धाग्यांवरून सीबीआयचे पथक लातूरपर्यंत पोहोचले. त्यानंतर कुलकर्णी यांची सखोल चौकशी करण्यात आली. लातूरमधील कैलास नगर येथील कुलकर्णी यांच्या घराला सध्या कुलूप असून त्यांचे कुटुंब पुण्यात राहत असल्याची माहिती आहे. सीबीआयचे दुसरे पथक अद्याप लातूरमध्ये ठाण मांडून असून, पुढील धागेदोरे आणि संभाव्य संपर्कांची तपासणी सुरू आहे.

NEET Exam Paper Leak: देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत देशभरातून सात प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे, पुण्यातील मनीषा वाघमारे, जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल आणि गुरुग्राममधून यश यादव यांचा समावेश आहे. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आता लातूरमधील संशयितांची चौकशी केली जात आहे. तसेच, धनंजय लोखंडे याचा मित्र ओंकार शिंगोटे याची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.  

NEET UG 2026 Re-Exam Date: 21 जूनला होणार पुनर्परीक्षा

दरम्यान, 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आता या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. 21 जून रोजी नीटची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. पेपरफुटीमुळे वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मोठे नुकसान झाले असून, शैक्षणिक वेळापत्रकही कोलमडले आहे. मात्र, सीबीआयच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. आता लातूरमधील या छाप्यात नेमके काय निष्पन्न होते आणि आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

NEET Exam Paper Leak: नीटच्या विद्यार्थ्यांची नाराजी 

नीटच्या पेपर फुटी प्रकरणानंतर आता या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर बीडमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आहेत. या विद्यार्थ्यांसमोर पुढे नेमकं काय करायचं? याचा पेच निर्माण झालाय. यावरच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मात्र पुन्हा होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. दोन ते तीन वर्ष अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवले. मात्र, या पेपर फुटीमुळे आमची मेहनत वाया गेली, अशी नाराजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. अचानक परीक्षा रद्द केल्यानं विद्यार्थ्यांवर आघात झाला. बीड सारख्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर रूम सोडून गेले होते. परंतु आता या विद्यार्थ्यांना एक दोन महिन्यांसाठी कोण रूम देणार? असा सवाल शिक्षक विचारत आहेत. एवढ्या निगराणीखाली परीक्षा झाली असताना पेपर लीक कसा होतो? शासनाला हे माहीत कसं होत नाही? या मुलांचा दोष काय? असे प्रश्न बीडच्या शिक्षकांनी उपस्थित केले.

why neet exam 2026 cancelled : नीटची परीक्षा रद्द का झाली? 

  • राजस्थानातील सीकरमध्ये नीट परीक्षेपूर्वी 'गेस पेपर'चे वितरण
  • 'गेस पेपर'मध्ये एकूण 410 प्रश्न होते
  • 'गेस पेपर'मधील 120 ते 135 प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे
  • नीटच्या परीक्षेशी जुळलेले बहुतांश प्रश्न रसायनशास्त्र विषयाचे
  • प्रश्नांतील साधर्म्य हा अचूक अंदाज की पेपरफुटी याची चौकशी झाली
  • प्राथमिक चौकशीतील बाबी पाहून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

आणखी वाचा 

NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget