मोबाईलचा वाद भोवला! मालेगावात 29 वर्षीय युवकाला झटक्यात संपवलं!
Crime News Update : नाशिकसह जिल्ह्यात पोलिसांचा वचक दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

Nashik Latest Crime News Update : नाशिकसह जिल्ह्यात पोलिसांचा वचक दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाढवळ्या हाणामारी, लूटमार, प्राणघातक हल्ल्यांसह खुनाच्या घटना सर्रास घडत आहेत. अशातच मालेगाव (Malegaon Crime News) शहरातील आझादनगर भागांत मोबाईलवरून झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे.
वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिककरांसह (Nashik) जिल्ह्यातील नागरिक सध्या भयभीत आहेत. प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, टोळकेच्या टोळके सर्रासपणे हातात चॉपर, कोयते घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगाव शहरात खुनाची घटना घडली आहे. येथील आझादनगर भागांत मोबाईल घेतल्यावरून झालेल्या वादात संशयितांने फिर्यादीच्या भाच्यास जीवे ठार मारल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरिफ खान असिफ खान याने फिर्यादीचा भाचा सलमान याचा मोबाईल घेतला होता. यावरून सलमान आणि संशयितांमध्ये वाद सुरू होते. अशातच काल सायंकाळच्या सुमारास सलमानच्या गल्लीत संशयिताने भांडण उकरून काढले. किरकोळ कारणावरून सुडू झालेला वाद बाचाबाचीवर येऊन पोहोचला. यावेळी संशयितांने चाकू काढत सलमानच्या पोटात भोसकला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेत आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचं वचक कमी झालाय?
टोळकेच्या टोळके सर्रासपणे हातात चॉपर, कोयते घेऊन रस्त्यावर फिरतायत. किरकोळ कारणांवरून नागरिकांना मारहाण केली. ही सर्व परिस्थिती बघता नाशिक पोलिस करतायत तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रात्रीची पेट्रोलिंग वाढवली असून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत असून सराईत गुन्हेगारांवर मोक्का आणि ईतर कारवाया देखील करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, मात्र अशा घटना घडत असतांना नेमकं पोलीस कोणतं पेट्रोलिंग करतात, हा महत्वाचा प्रश्न आहे.
ही बातमी वाचायला विसरु नका ;























