एक्स्प्लोर

Nashik News : नाशकात चाललंय तरी काय? शहरात सात वाहनांची जाळपोळ, नागरिकांमध्ये संताप

Nashik Crime News : जुन्या नाशकात अज्ञात समाजकंटाकांकडून सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Nashik Crime News नाशिक : गंगापूर रोड श्रमिकनगरमध्ये काही दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता जुन्या नाशकात (Old Nashik) अज्ञात समाजकंटाकांकडून सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. पाच दुचाकी, एक छोटा हत्ती आणि एक हातगाडी अशा सात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Nashik Crime News) करण्यात आले आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी (Nashik Police) अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.  या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जुन्या नाशकातील कुंभारवाड्यात ही घटना घडली आहे. वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

आग विझविण्यासाठी घरातील पाण्याचा वापर

परिसरातील लोकांनी आग विझविण्यासाठी घरातील पाण्याचा वापर केला. घटनेचा पंचनामा केल्यानंतर सर्व नुकसानग्रस्त वाहने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली. तसेच अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. 

समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

या घटनेमुळे जुन्या नाशकातील नागरिकांमध्ये संताप करण्यात येत आहे. अशा समाजकंटकांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे. यापूर्वी देखील भद्रकाली हद्दीतील चौक मंडई परिसरातील बिरबल आखाडा भागात वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला होता. तसेच शहरातील इतर भागांमध्ये वाहनांची जाळपोळ करण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

श्रमिकनगरला वाहनांच्या तोडफोडप्रकरणी पाच जण ताब्यात

सातपूरच्या श्रमिकनगर (Shramiknagar) परिसरात रविवारी मद्यपी टोळक्याने गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून अन्य संशयितांना शोध सुरु आहे. पाच जणांपैकी चार जण हे सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

गंगापूर रोडवर तोडफोड करणाऱ्यांची धिंड

गंगापूर जकात नाका (Gangapur Road) येथे रस्त्याने जाणाऱ्या गाड्या अडवून त्यांच्यावर दगडफेक करीत काचा फोडणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक करून त्यांची धिंड काढली. हे पाचही संशयित फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी गुप्त खबऱ्यामार्फत शोध घेतला. अनिकेत उर्फ पप्पू शार्दल, प्रतीक जाधव, विजय कोटरे, चिंटू गागुंडे, रोहित वाडगे हे सर्व शिवाजीनगर, ध्रुवनगर भागात राहतात. त्यांना कोकणगाव (ता. दिंडोरी) येथून पथकाने ताब्यात घेतले. त्यांना अटक केल्यानंतर ज्या भागात काचा फोडल्या त्या भागातून त्यांची धिंड काढण्यात आली.

आणखी वाचा 

मोदी, उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेही करणार काळाराम मंदिरात आरती; नाशिकमध्ये प्रथमच साजरा होणार मनसेचा वर्धापन दिन

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget