एक्स्प्लोर

Nashik Crime News: 400 कोटी रुपयांनी भरलेले दोन कंटेनर कसे लुटले? नाशिकमधील तरुणाने सांगितला संपूर्ण थरार; म्हणाला...

Nashik Crime News : निवडणुकीच्या धामधुमीत तब्बल 400 कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचा मोठा कट उघडकीस आला आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News : राज्यात महापालिका निवडणुकांचा धुरळा अजून खाली बसलेला नसतानाच नाशिकमधून (Nashik) एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत तब्बल 400 कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचा मोठा कट उघडकीस आला असून, या प्रकरणात राजकीय आणि बिल्डर लॉबीचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आलाय. या गंभीर प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे, नाशिकमधील एका तरुणाच्या अपहरणाच्या तपासातून हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये संदीप पाटील (Sandeep Patil) या तरुणाचं अपहरण झालं होतं. या प्रकरणाच्या तपासादरम्यान कर्नाटकमधील चोरला घाटात 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या कंटेनर लुटीचा मोठा खुलासा झाला. गोव्याहून कर्नाटकमार्गे एका ट्रस्टकडे जाणाऱ्या दोन कंटेनरमध्ये तब्बल 400 कोटी रुपये होते. हे पैसे 2000 रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे (मुंबई) यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime News: संदीप पाटीलचा धक्कादायक खुलासा

या प्रकरणात पीडित संदीप पाटील याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत थरारक माहिती उघड केली आहे. व्हिडीओमध्ये संदीप पाटीलने म्हटले आहे की, “16 ऑक्टोबर 2025 रोजी कर्नाटकमधील चोरला घाटात दोन कंटेनरमध्ये 400 कोटी रुपये होते. हे पैसे गोव्याहून कर्नाटकमार्गे एका ट्रस्टकडे जात होते. रात्रीच्या अंधारात हे कंटेनर लुटण्यात आले. या कंटेनरमधील 2000 रुपयांच्या जुन्या नोटांचा मूळ मालक ठाण्यातील एक बिल्डर आहे. 20 ऑक्टोबर रोजी जयेश कदम याचा मला व्हॉट्सअॅपवर फोन आला. तुझ्या नावाने तक्रार आहे, चौकशी करायची आहे, असं सांगून २२ ऑक्टोबरला मला घोटीला बोलावण्यात आलं. तिथे मला जबरदस्तीने फॉर्च्युनर गाडीत बसवून नाशिकला आणलं. गाडीत विशाल नायडू आणि सुनील धुमाळ होते. त्यांनी मला मारहाण करत ‘तूच कंटेनर लुटलास’ असा आरोप केला,” असे त्याने म्हटले आहे. 

Nashik Crime News: पोलीस काय म्हणाले?

या प्रकरणाबाबत अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य निखेलकर यांनी माहिती देताना सांगितले, “संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटीचा खोटा आरोप करत काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या, मारहाण केली आणि अपहरण केलं. या प्रकरणात आम्ही 5 आरोपींना अटक केली असून 2 आरोपींचा शोध सुरू आहे. तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.”

Nashik Crime News: SIT स्थापनेचा निर्णय

या प्रकरणाचं स्वरूप अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि उच्च आर्थिक मूल्याचं असल्याने तसेच यात राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेता, निष्पक्ष आणि स्वतंत्र तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उघड झालेल्या या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा 

Nagpur Crime News: फिरायला जाण्याच्या बहाण्याने OYO मध्ये नेलं, बॉयफ्रेंडने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या गर्लफ्रेंडला संपवलं; नागपूरमधील घटनेचं गूढ उकललं!

महत्त्वाच्या बातम्या

कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget