जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ
भिवंडीत (Bhiwandi )एक धक्कादायक घटना घडली आहे. जाब विचारायला गेलेल्या 65 वर्षीय रिक्षाचालकाचा हाणामारीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Bhiwandi Crime News : भिवंडीत (Bhiwandi ) एक धक्कादायक घटना घडली आहे. जाब विचारायला गेलेल्या 65 वर्षीय रिक्षाचालकाचा हाणामारीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरातील ठाणा रोड परिसरातील समदनगरमध्ये ही घटना घडली आहे. जमील अहमद मोमीन असं मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना घडली कशी?
दरम्यान, भिवंडी शहरातील ठाणा रोड परिसरातील समदनगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही तरुणांकडून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कमेंट केल्या जात होत्या. यावेळी याबाबतचा जाब विचारण्यासाठी रिक्षाचालक गेला होता. यावेळी तरुणांच्या मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमील अहमद मोमीन वय 65 वर्ष असे मृत रिक्षाचालकाचे नाव अआहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, समदनगर परिसरात राहणारे जमील अहमद मोमीन हे समदनगर परिसरातून जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणांकडून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर कमेंट केल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत जाब विचारण्यासाठी ते तरुणांकडे गेले. मात्र, याच कारणावरून त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि काही तरुणांनी जमील अहमद मोमीन यांना बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने जमील अहमद मोमीन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
नांदेडमध्ये आज धक्कादायक घटना
नांदेडमध्ये आज धक्कादायक घटना घडली आहे. शहीदपुरा भागात सासू आणि मुलगी घरातून बाहेर जात असताना जावई गगनसिंग उर्फ लकी याने पाठीमागून येत हल्ला केला. या हल्ल्यात सासूचा जागी मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याची0 माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. हा हल्ला केल्या नंतर आरोपी हा फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे.
Before You Go
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!





















