एक्स्प्लोर

Nashik Crime News: शेअर मार्केट अन् प्लास्टिक कंपनीत भागीदारीचं आमिष दाखवलं, नाशिकमधील वकील, सरकारी नोकरदारांसह 40 जणांना कोट्यवधींचा गंडा; नेमकं काय घडलं?

Nashik Crime News: शेअर मार्केटमध्ये भरघोस परतावा आणि प्लास्टिक कंपनीत भागीदारीचे आमिष दाखवून नाशिकमधील 40 हून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

Nashik Crime News: शेअर मार्केटमध्ये (Share Market) दरमहा 4 ते 6 टक्के इतका भरघोस परतावा देण्याचे आणि प्लास्टिक कंपनीत भागीदारीचे आमिष दाखवून नाशिकमधील वकील, सरकारी नोकरदार आणि अधिकाऱ्यांसह 40 हून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या जानवलकर कुटुंबाचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या टोळीतील युवराज आणि यश या दोन सख्ख्या भावांना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने रायगड जिल्ह्यातून अत्यंत शिताफीने अटक केली आहे.

Nashik Crime News: बनावट फर्म स्थापन करून विणले जाळे

संशयित यश सुरेश जानवलकर, युवराज सुरेश जानवलकर, सुरेश बाबुराव जानवलकर आणि संगीता सुरेश जानवलकर या संपूर्ण कुटुंबाने नाशिकमध्ये आपले जाळे विणले होते. त्यांनी ‘फ्युचर स्टॉक मार्केट अनॅलिसिस’ नावाची एक बनावट इन्व्हेस्टमेंट फर्म सुरू केली होती. एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2025 या काळात त्यांनी अनेकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. केवळ शेअर मार्केटच नव्हे, तर सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसी आणि अंबड येथील त्यांच्या प्लास्टिक बॉटल बनवण्याच्या कंपनीत भागीदारी देण्याचे आमिषही त्यांनी दाखवले. या आमिषाला बळी पडून समाजातील सुशिक्षित वर्ग, वकील व शासकीय कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये गुंतवले. या प्रकरणातील एका मुख्य फिर्यादीचीच (Complainant) तब्बल 60 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Nashik Crime News: राहते घरही 2 ते 3 लोकांना विकून संपूर्ण कुटुंब फरार

गुंतवणूकदारांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी पैशांचा तगादा लावताच, या भामट्या कुटुंबाने नाशिकमधील आपले राहते घर थेट 2 ते 3 वेगवेगळ्या ग्राहकांना साठेखत आणि खरेदीखत दस्तऐवज करून बेकायदेशीरपणे विकून टाकले. तिथून सर्व जमापुंजी गोळा करून संपूर्ण कुटुंबच नाशिक सोडून पसार झाले होते. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Nashik Crime News: रायगड जिल्ह्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखा युनिट-2 चे पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढत होते. हे संशयित आरोपी रायगड जिल्ह्यात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळताच, पथकाने खालापूर, नेरळ आणि खोपोली परिसरातून युवराज सुरेश जानवलकर (वय 32) आणि यश सुरेश जानवलकर (वय 30) या दोन्ही भावांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Beed Crime Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस, प्रकरण मिटवून घ्यायला सांग'; साक्षीदार दादा खिंडकरला सख्ख्या भावाकडूनच धमकी, नेमकं प्रकरण काय?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget