एक्स्प्लोर

Nashik Crime News: 400 कोटींच्या कंटेनर चोरी प्रकरणात मोठी घडामोड, मुख्य संशयित पोलिसांना शरण, खरंच चोरी झाली की बनाव?

Nashik Crime News: कर्नाटकातील चोरली घाट परिसरात तब्बल 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेच्या कंटेनर चोरीच्या संशयातून उभ्या राहिलेल्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे.

Nashik Crime News: कर्नाटकातील (Karnataka) चोरली घाट परिसरात तब्बल 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेच्या कंटेनर चोरीच्या संशयातून उभ्या राहिलेल्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक किशोर सावळा (Kishore Savla) यांनी अखेर पोलिसांसमोर (Police) शरणागती पत्करली आहे. त्यांना आज न्यायालयात (Court) हजर करण्यात येणार असून, या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धामधुमीत गोव्यातून कर्नाटक राज्यात जुन्या दोन हजार रुपयांच्या नोटांनी भरलेला सुमारे 400 कोटी रुपयांचा कंटेनर नेत असताना चोरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच कथित चोरीच्या संशयावरून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील संदीप पाटील यांचे अपहरण करून मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप समोर आला.

Nashik Crime News: अपहरण प्रकरणात 6 जण अटकेत, सातवा आरोपी होता फरार

संदीप पाटील यांच्या अपहरण प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, सातवा आरोपी किशोर सावळा याला अटक करण्यात पोलिसांना अद्याप अपयश आले होते, अखेर त्याने स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला.

Nashik Crime News: किशोर सावळाच्या चौकशीत मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता

कथित 400 कोटी रुपयांची रक्कम ही मुंबई-ठाणे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे किशोर सावळाच्या चौकशीत आर्थिक व्यवहार, बनावट कथानक आणि राजकीय हस्तक्षेपाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nashik Crime News: खरंच 400 कोटींची चोरी झाली की बनाव?

गोव्यातून कर्नाटकातील एका देवस्थानासाठी दोन हजार रुपयांच्या जुन्या नोटा नेल्या जात होत्या, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, नोटाबंदी झालेल्या 2000 रुपयांच्या नोटांचा एवढा मोठा साठा कुठून आला, कुठे नेला जात होता? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. आता मुख्य संशयित किशोर सावळा पोलिसांना शरण आल्यानंतर 400 कोटी रुपयांच्या नोटांची खरंच चोरी झाली होती की बनाव होता? याचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

 

आणखी वाचा 

Nashik Crime News: 400 कोटी रुपयांनी भरलेले दोन कंटेनर कसे लुटले? नाशिकमधील तरुणाने सांगितला संपूर्ण थरार; म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget