एक्स्प्लोर

Nashik Crime News: भावली धरणावर छेडछाड अन् राडा, चारवेळा जीवघेणा हल्ला, इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीला लटकून हल्ला करणारा गुंड शेवटी हायवेवरच धाडकन पडला

Nashik Crime News: या व्हिडिओमध्ये या हल्लेखोरांपैकी एकाने या पर्यटकांच्या चालत्या गाडीला लटकून हल्ला केला असल्याचं समोर आलं आहे.

नाशिक : भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावरती ४ ते पाच वेळा जीवघेणा हल्ला करून महिलेचा विनयभंग त्रास देणाऱ्या नऊ जणांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केले आहे. या प्रकरणातील आणखी तीन आरोपींची नावे समोर आलेली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. काही आरोपी वाडा, भिवंडी परिसरात तर काहीजण लॉजमध्ये (Nashik Crime News) बनावट नावाने वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. तेथून त्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांना बुधवारी (दि.१५) न्यायालयात हजर केले जाईल. अटकेतील सर्व संशयित इगतपुरी परिसरातील आहे. तर नाशिकच्या भावली (Nashik Crime News) धरण परिसरातील पर्यटकांना मारहाण प्रकरणातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या पर्यटकांना इगतपुरीच्या भावली परिसरातातील टवळखोरांनी पाठलाग करत मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये या हल्लेखोरांपैकी एकाने या पर्यटकांच्या चालत्या गाडीला लटकून हल्ला केला असल्याचं समोर आलं आहे.(Nashik Crime News)

हा सगळा थरार नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर सुरू असल्याचा हा व्हिडिओ (Nashik Crime News) समोर आला आहे. ज्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे हल्लेखोर गाडीला लटकलेला दिसतोय आणि त्यानंतर काही अंतरावर जाऊन तो लटकलेल्या गाडीवरून हायवेवर पडताना दिसतोय. या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे तर आणखी काही आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. या प्रकरणातील फिर्यादींनी देखील त्यांच्या फिर्यादीत या घटनेचा उल्लेख केला होता. आता त्याच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, हा व्हिडिओ रस्त्यावरील नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केल्याचे दिसते आहे.(Nashik Crime News)

Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय?

रविवारी दुपारच्या सुमारास नाशिकरोड येथील कुटुंब भावली परिसरात धरण पर्यटनासाठी गेले होते. धबधबा पाहत असताना दोन युवकांनी महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर वाद घालत मारहाण करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी कुटुंब कारने नाशिकच्या दिशेने निघाले असताना आरोपींनी त्यांच्या वाहनाचा सुमारे २० किलोमीटर पाठलाग करून लोखंडी व लाकडी दांडक्यांनी कारच्या काचा फोडल्या, दगडफेक केली आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींना चौकशीत विश्वासात घेतल्यानंतर कैलास भागडे, आकाश भोईर आणि तुषार कडू या साथीदारांची नावेही समोर आली असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर काही सुरक्षेचे उपाय राबविण्याचे निर्देश दिले असून, प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा फिक्स पॉइंट निश्चित केला जाईल. मोबाइल व्हॅनही तैनात असेल. याशिवाय ११२ डायल प्रणालीचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक पर्यटनस्थळी पोलिसांचे हेल्पलाइन दर्शविणारे फलक लावले जातील. पर्यटनस्थळी दिवसा पोलिस ठाणेनिहाय पेट्रोलिंग वाढविण्यावर भर दिला जाईल.

Nashik Crime News:  अटकेतील आरोपींची नावे

विशाल मच्छिंद्र भटाटे (२७, रा. गिरणारे), अनिकेत गणेश मानवेढे (२४, रा. गिरणारे), अनिरुद्ध विठोबा भागडे (२५, रा. नांदगाव सदा), सागर उर्फ लोकेश गोकुळ गिते (२२, रा. माणिकखांब), विनोद लक्ष्मण बोराडे (२६, रा. इगतपुरी गावठा), सचिन दत्तू आडोळे (२९, रा. माणिकखांब), अर्जुन चिंधू आडोळे (२५, रा. माणिकखांब), देवीदास कचरू भगत (२५, रा. बलायदुरी), अजय भूषण दालभगत (२०, रा. देवळे, घोटी) यांना अटक करण्यात आली असून, कैलास भागडे, आकाश भोईर, तुषार कडू फरार आहेत. आकाशवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यात जामीन मिळाला आहे.

Nashik Crime News: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या आरोपीना न्यायालयात हजर केले जाणार

पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या आरोपीना आज न्यायालयात हजर जाणार केले. इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटनसाठी गेलेल्या पर्यटकांवर गावगुंडानी पाठलाग करून हल्ला केला. याप्रकरणी 9 संशयित आरोपीना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपीना आज इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget