एक्स्प्लोर

Nashik Crime News: घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी

Nashik Crime News: नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी महिला आयोगाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nashik Crime News: नाशिकमधील (Nashik) नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर आले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वतः लक्ष घातले असून तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक बाबी समोर येत आहेत. हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत कशाप्रकारे महिलांना मानसिक आणि शारीरिक जाचाला सामोरे जावे लागले, याचे विदारक चित्र आता समोर आले आहे.

Nashik Crime News:  वडिलांच्या उपचारासाठी सोसला मानसिक छळ

तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एका पीडित तरुणीने केवळ आपल्या कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी हा 'कॉर्पोरेट' अत्याचार सहन केला. वडिलांची किमोथेरपी आणि औषधांच्या पैशांची गरज असल्याने, तिने वरिष्ठांकडून होणारा मानसिक छळ आणि अपमान निमूटपणे सोसला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे "नोकरी टिकवणे" ही तिची अपरिहार्यता होती, ज्याचा फायदा नराधमांनी घेतला.

Nashik Crime News: धर्मांतराचा छुपा अजेंडा

दुसरीकडे, एका दुसऱ्या पीडितेने राष्ट्रीय महिला आयोगासमोर धक्कादायक माहिती दिली आहे. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असताना, तिला नोकरीच्या बदल्यात धर्मांतर करण्याच्या छुप्या अजेंड्याला बळी पाडण्यात आले. "वडिल आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले आहेत आणि घरची भूक मिटवण्यासाठी मला हे सर्व सहन करावे लागले," अशी कैफियत पीडितेने मांडली आहे.

Nashik Crime News:  महिला आयोगाची कारवाई

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने काल TCS कंपनीला प्रत्यक्ष भेट दिली. सुमारे एक तास चाललेल्या या पाहणीत पथकाने खालील बाबींची तपासणी केली. पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, कामाचे विविध विभाग आणि सुरक्षितता, कॅन्टीन आणि वेटिंग रूममधील सीसीटीव्ही फुटेज व व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. महिला आयोगाने काही पीडित तरुणींशी संवाद साधून त्यांची 'आपबिती' जाणून घेतली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी आयोगाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. आजच्या चौकशीत काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nida Khan : धर्मांतर प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खानचं मुंब्रा कनेक्शन! फरार असताना मुंबईत डॉक्टरांची भेट; मेडिकल सर्टिफिकेट अन् विश्रांतीचा सल्ला, नेमकं काय घडलं?

Nida Khan: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील 'मास्टरमाइंड' निदा खानची हकालपट्टी, नामांकित कंपनीचं 'ते' पत्र समोर, नेमकं काय म्हटलंय पत्रात?

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget