एक्स्प्लोर

Nashik Crime News: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार

Nashik Crime News: नाशिकमधील एका नामांकित कंपनीत झालेल्या धर्मांतर प्रकरणाचा आता NIA कडूनही तपास केला जाणार आहे.

Nashik Crime News: नाशिकमधील (Nashik) एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचा जो खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता, त्याला आता राष्ट्रीय वळण मिळाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संभाव्य दहशतवादी कनेक्शन पाहता, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

Nashik Crime News: NIA कडे कागदपत्रे सुपूर्द

नाशिक पोलिसांनी (Nashik Police) या प्रकरणातील तपासाची सर्व महत्त्वाची कागदपत्रे आता NIA कडे सोपवली आहेत. या प्रकरणामागे केवळ धर्मांतर नसून काही देशविघातक शक्तींचा हात आहे का? याचा तपास केला जाणार आहे. आरोपींना पैशांचा पुरवठा नेमका कुठून होत होता? परदेशातून या रॅकेटला आर्थिक मदत मिळत होती का? या 'सोर्स'चा शोध NIA घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणाशी या प्रकरणाचे काही धागेदोरे जुळतात का? याचीही पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.

Nashik Crime News: राष्ट्रीय महिला आयोगाची 'स्पेशल कमिटी' मैदानात

या प्रकरणाची दखल घेत आज राष्ट्रीय महिला आयोगाचे (NCW) उच्चस्तरीय पथक नाशिकमध्ये दाखल होत आहे. हे पथक थेट कंपनीच्या आवारात जाणून पाहणी करणार आहेत.या पथकात निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे निवृत्त डीआयजी बी. के. सिन्हा, सुप्रीम कोर्टाच्या ॲडव्होकेट मोनिका अरोरा यांचा समावेश आहे. हे पथक केवळ पाहणीच करणार नाही, तर पीडित महिलांशी सविस्तर चर्चा करून आपला गोपनीय अहवाल आयोगाला सादर करणार आहे.

Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय?

नाशिकमधील एका कॉर्पोरेट कंपनीत हिंदू मुलींना टार्गेट करणे, त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे आणि विरोध केल्यास लैंगिक व मानसिक छळ करणे, असे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. हे सर्व कृत्य एका विशिष्ट व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नियंत्रित केले जात होते. या प्रकरणाची मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार असून, पोलीस तिच्या शोधासाठी तीन पथके तैनात केली आहेत. आतापर्यंत कंपनीच्या HR अश्विनी चैनानीसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

Nashik Crime News: 150 कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'

तपासाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाने कडक पावले उचलली आहेत. कंपनीत सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंतर्गत 'झाडाझडती' सुरू असून, 150 कर्मचाऱ्यांना Work From Home देण्यात आले आहे. कामगार उपायुक्त कार्यालयाने कंपनीचे 'शॉप ॲक्ट लायसन्स' आणि इतर तांत्रिक कागदपत्रे जप्त केली आहेत.

आणखी वाचा 

धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना

महत्त्वाच्या बातम्या

कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget