एक्स्प्लोर

बापानेच पोटच्या पोराचा गळा दाबला, 9 वर्षीय मुलाचा मृतदेह गोणीत भरून सासूरवाडीत फेकला, नाशिक हादरले

Nashik Crime news: नाशिकमधून सलग दुसऱ्या दिवशी ही हत्येची घटना समोर आल्याने संपूर्ण शहरात खळबळ आहे. मुलाच्या मृत्यूने कुटुंबीय सुन्न झाले आहेत.

Nashik Crime: नाशिक शहरात बाप मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या आम्रपाली परिसरात एका वडिलाने रागाच्या भरात आपल्या  9 वर्षांच्या मुलाची गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. एवढंच नाही तर बापाने हत्येनंतर मुलाचा मृतदेह गोणीत टाकून सासूरवाडीला नेत पलंगावर टाकल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सुमित पुजारी असे मुलाच्या वडिलांचे नाव आहे. या घटनेनंतर  नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपासासाठी नाशिक गुन्हे शाखेचे शोध पथक रवाना झाल्याची माहिती आहे. (Nashik Crime News)  नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी ही हत्येची घटना समोर आलीय.

नक्की घडले काय?

नाशिकमध्ये अतिशय थंड काळजाने बापाने आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला गळा आवळत संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हत्येनंतर मुलाला गोणीत भरत सासूरवाडीला नेत तिथल्या पलंगावर टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या  घटनेमुळे संपूर्ण नाशिक हादरले आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.उपनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून सध्या सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर आलं आहे. सुमित पुजारी (वय 35) असे आरोपी वडिलाचे नाव असून त्यांनी आपल्या मुलगा गणेश पुजारी याची हत्या केली. कौटुंबिक वादातून झालेल्या वादानंतर रागाच्या भरात सुमित यांनी स्वतःच्या मुलाचा गळा आवळून त्याचा जीव घेतला.

प्राथमिक माहितीनुसार, घरात सतत वादाचे वातावरण होते. सुमित पुजारी हे काही दिवसांपासून तणावाखाली असल्याचे समोर आले. कौटुंबिक कलह वाढल्याने पोटच्या पोराचा गळा घोटत त्याला ठार केल्याचं समोर आलं आहे. नक्की काय वाद झाला? कौटुंबिक वाद किती गंभीर होता? आणि इतक्या टोकाचं पाऊल उचलण्यामागचं नेमकं सत्य काय आहे? हे सर्व तपासानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान या घटनेच्या तपासासाठी नाशिक गुन्हे शाखेचे एक शोधपथक घटनास्थळी रवाना झालं आहे. नाशिकमधून सलग दुसऱ्या दिवशी ही हत्येची घटना समोर आल्याने संपूर्ण शहरात खळबळ आहे. मुलाच्या मृत्यूने कुटुंबीय सुन्न झाले आहेत.

हेही वाचा:

कन्यादान केलं, लेकीच्या डोक्यावर अक्षताही पडल्या; लग्नमंडपातच वडिलांना ह्रदयविकाराचा झटका, गाव हळहळलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget