एक्स्प्लोर

Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना

Nashik Crime News: गाडीला कट मारल्याच्या एका अतिशय किरकोळ कारणावरून कार चालकाने एका दुचाकीस्वारावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Nashik Crime News: नाशिक  (Nashik) जिल्ह्यातील मनमाड (Manmad) शहरातून एक धक्कादायक गुन्हेगारी घटना (Crime News) समोर आली आहे. गाडीला कट मारल्याच्या एका अतिशय किरकोळ कारणावरून कार चालकाने एका दुचाकीस्वारावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या मुजोर कार चालकाने दुचाकीस्वाराच्या पोटात थेट चाकूने वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. हा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनमाड शहरात खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News: नेमकं काय घडलं?

इरफात बेग असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. इरफात हा आपल्या दुचाकीवरून मनमाड शहरातील चोपडा पेट्रोल पंपाजवळून जात होता. याच वेळी येवल्याच्या दिशेने सुसाट वेगाने जाणाऱ्या एका कारचा इरफातच्या दुचाकीला कट लागला. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी इरफातने कार चालकाला अडवले. मात्र, कार चालकाला याचा इतका राग आला की, त्याने कसलाही विचार न करता थेट चाकू काढला आणि इरफातच्या पोटात खुपसला.

Nashik Crime News: पोलिसांचा 25 किलोमीटर थरारक पाठलाग 

इरफातवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून कारसह सुसाट वेगाने फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी (Manmad Police) तत्काळ वायरलेसवरून मेसेज पाठवून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश दिले. आरोपी कारसह येवल्याच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी तब्बल 25 किलोमीटरपर्यंत या कारचा थरारक पाठलाग केला.

Nashik Crime News: पोलिसांच्या अंगावर घातली कार 

मनमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून येवला पोलिसांनी (Yeola Police) शहराजवळ नाकाबंदी करून आरोपीची कार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोर पोलीस उभे असल्याचे पाहूनही मुजोर कार चालकाने कारचा वेग कमी करण्याऐवजी ती थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा आणि त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि जीवाची बाजी लावून बाजूला होत कारची नाकेबंदी केली आणि अखेर आरोपीला घेराव घालून बेड्या ठोकल्या.

Nashik Crime News: आरोपी पोलिसांच्या ताब्यात; जखमी तरुण रुग्णालयात

पोलिसांनी अटक केलेल्या या मुजोर कार चालकाचे नाव लक्ष्मीकांत शेजवळ असे आहे. पोलिसांनी त्याची कार जप्त केली असून, त्याच्याविरोधात मनमाड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इरफात बेग याच्या पोटात गंभीर जखम झाल्यामुळे त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील तातडीच्या उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik Politics: नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर दराडेंना आणखी एक मोठा धक्का, शिवसेनेचे 7 नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार? भुजबळांच्या ऑफिसमध्ये पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget