एक्स्प्लोर

Nashik : शेअर मार्केटचं आमिष पडलं महागात, नाशिकमध्ये व्यावसायिकाची पावणे चार कोटींची फसवणूक

Nashik News : शेअर मार्केट ट्रेडिंगमधून चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकास तब्बल तीन कोटी 70 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Crime News नाशिक : शेअर मार्केटचे आमिष नाशिकच्या एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमधून (Stock market trading) चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून शहरातील व्यावसायिकास तब्बल तीन कोटी 70 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसात (Nashik Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर भामट्यांनी नाशिक (Nashik) येथील एका व्यावसायिकास गेल्या महिन्याभरापासून व्हॉटसॲपवर एका ग्रुपमध्ये ॲड केले होते. त्यावर शेअर मार्केट ट्रेडिंगविषयी अधिकृत वाटेल अशी माहिती दिली जात होती. शेअर ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास मोठा परताव्याचे आमिष या व्यावसायिकाला दाखवण्यात आले होते. 

साडेतीन कोटी गुंतवा, साडेसात मिळतील म्हणत फसगत 

व्यावसायिकाला संशयितांनी साडेतीन कोटी गुंतवल्यास तुम्हाला थेट साडेसात कोटी मिळतील, अशी स्कीम सांगितली. आम्हीही असेच पैसे गुंतविले आहेत. त्याचा आम्हाला इतक्या रुपयांचा फायदा झाला आहे. हे खात्रीशीर आहे. बिनधास्त पैसे टाका अन् कमवा, असे मेसेज व्यावसायिकाला करण्यात आले. यामुळे व्यावसायिकाने सायबर भामट्यांवर विश्वास टाकला आणि त्या स्कीममध्ये पैसे गुंतवले. त्यानंतर साडेसात कोटी रुपये काढताना व्यावसायिकाला अडचण आली. त्यामुळे व्यावसायिकाच्या मुलाने या अ‍ॅपची माहिती घेतली. त्यावेळी मुलाला आपल्या वडिलांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने तत्काळ सायबर पोलिसात धाव घेतली आणि आपली आपबिती पोलिसांना सांगितली. त्यानुसार ब्लॅकरॉक कॅपिटल सिक्युरिटीज मार्केट पुलअप टीम नावाचा व्हाट्सअॅप ग्रुप व त्यावरील क्रमांक 916300626686, 9482347361, 9417418197, अँजल वन कस्टमर केअर या नावाच्या ग्रुपमधील व्हाटस्अ‍ॅप क्रमांक 9226156675, 9472263175, 918762699376, 918235835947 आणि मेलिस्सा तसेच ऑनलाइन पद्धतीने पैसे वर्ग झालेले बँक खातेधारक या सायबर भामट्यांविरोधात नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत. 

पिंपळगावला अ‍ॅक्सिस बँकेची फसवणूक

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) शाखेत तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. बनावट डिमांड ड्राफ्ट भरून त्याचे पैसे काढून घेणारा संशयित आरोपी एस. के. ट्रेडिंगचे संचालक अनिकेत श्रीनिवास मुदंडा (रा. चिंचखेड रोड, महेशनगर, बालाजी मंदिराजवळ, पिंपळगाव बसवंत) याच्याविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Pune Drug Racket : थेट न्यायाधीशच पोहचले मुद्देमालाचा पंचनामा करायला, पुण्यातील पहिलीच घटना; कारण ठरलं...

संभाजीनगरच्या गरुडझेप अकॅडमीत आणखी एक आत्महत्या, पोलिसांच्या छापेमारीत मोठा खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget