मोठी बातमी : नाशिक बाजार समितीचे वादग्रस्त माजी सचिव अरुण काळेंना अटक, सहकार क्षेत्रात खळबळ
Nashik News : नाशिकच्या बाजार समितीचे वादग्रस्त माजी सचिव अरुण काळे यांना अटक लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक : नाशिकच्या बाजार समितीचे (Nashik Bajar Samiti) वादग्रस्त माजी सचिव अरुण काळे (Arun Kale) यांना अटक लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) अटक केली आहे. बाजार समितीच्या नावाने बनावट पावती पुस्तक छापून अपहार केल्याची काळे यांच्या विरोधात करण्यात आली होती. विशेष म्हणजे याबाबत दोन वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता काळेंना अटक (Arrested) झाल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी सुनील विश्वनाथ जाधव (Sunil Jadhav) याने 1 डिसेंबर 2021 ते 24 मे 2022 या कालावधी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती संस्थेच्या दफ्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके (Receipt Books) तयार केली. त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला होता.
89 लाख 700 हजार 200 रुपयांचा अपहार
कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक (Nashik Krushi Utpanna Bajar Samiti) या संस्थेची एकूण 89 लाख 700 हजार 200 रुपयांचा अपहार करून कृषी उत्पन्न संस्थेची फसवणूक करून आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी एप्रिल 2024 मध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फसवणूक प्रकरणी उच्च न्यायालयाने (High Court) आपले निरीक्षण नोंदविताना तत्कालीन सचिव अरुण काळे यांच्या कार्यकाळात हा सर्व गैर कारभार झाला.
अरुण काळेंना अटक
अरुण काळेंना संशयित म्हणून गुन्ह्यात सहआरोपी म्हणून का घेतले नाही? यावरून बाजार समितीचे उच्च न्यायालयाने कान टोचले होते. तसेच, गैर कारभारातील पुस्तके जमा झाली नसताना कुठलीच कारवाई तत्कालीन सचिवांनी केली नसल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार बाजार समितीचे माजी सचिव अरुण काळे यांना पंचवटी पोलिसांनी फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत. अरुण काळे यांना अटक झाल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Crime : वर्गणी न दिल्याने एकावर गोळीबार, तीन महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या सराईताला बेड्या