एक्स्प्लोर

सख्ख्या भावाने घातला भावाच्या घरात दरोडा, 50 तोळयाचे दागिने घेऊन घरचा चोरटा फरार

नांदेड शहरातील सिडको परिसरात भावानेच सख्ख्या भावाशी असलेल्या शेतीच्या भांडणाचा राग मनात धरून, मुलाच्या मदतीने भावाच्या घरात धाडसी दरोडा घातल्याची घटना घडली आहे.

नांदेड : नांदेड शहरात गोळीबार, गावठी पिस्तुल, लुटपाट ह्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. रस्त्यावर जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावणे, व्यापाऱ्यांना लुटणे,गोळीबार या नेहमीच्या घटनेनंतर आता चोरट्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे.परंतु नांदेड शहरातील सिडको परिसरात भावानेच भावाच्या घरी धाडसी दरोडा टाकल्यामुळे एकच खळबळ उडालीय.

नांदेड शहरातील सिडको परिसरात भावानेच सख्ख्या भावाशी असलेल्या शेतीच्या भांडणाचा राग मनात धरून, मुलाच्या मदतीने भावाच्या घरात धाडसी दरोडा घातलाय. नांदेड शहरातील सिडको परिसरातील वात्सल्य नगरात राहणारे दाचावार कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील सकनूर चे रहिवाशी आहेत. सदर रमेश दाचावार, प्रदीप दाचावार, दिलीप दाचावार हे तिन्ही भाऊ व्यवसाया निमित्त आज तीस वर्षा पूर्वी नांदेड शहरात वास्तव्यास आले. आज काही वर्षापासून दाचावार कुटुंबातील रमेश दाचावार व मोठे भाऊ दिलीप दाचावार यांचे आई वडिलांच्या परंपरागत शेतीच्या वाटणी वरून निर्माण झाले. सदर शेती इतर मालमत्तेच्या वादावरून दोघां भावांची एकमेकांच्या विरोधात बऱ्याच तक्रारी नांदेड पोलिसात दाखल झालेल्या आहेत.

परंतु सदर मालमत्ता वाद थेट दरोडयापर्यंत जाण्याचे कारण असे की, दिलीप दाचावार यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा विक्रांत याला मालमत्तेच्या वादावरून बेदखल केले व घराबाहेर काढले. परंतु विक्रांतची परिस्थिती रमेश दाचावार यांना पाहवली नाही व त्यांनी पुतण्याला  दुकान टाकण्यासाठी आर्थिक मदत केली. पण बेदखल केलेल्या आपल्या मुलाला भावाने मदत केल्याचे दिलीप दाचावार यांनाआवडले नाही. भावाची पैशाची मस्ती जिरवायची विचार मनात पक्का केला. त्यानुसार छोटा मुलगा श्रीनिवास व त्याचे गुन्हेगारी पाश्वभूमी असणारे  मित्र कृष्णा ,संजय मोरे, आकाश गोगडरे यांच्या मदतीने भावाच्या घरावर दरोडा टाकून लुटण्याचा आराखडा आखण्यात आला.

त्यानुसार वात्सल्यनगर येथील एकाच घरात वरच्या मजल्यावर राहणारे भाऊ रमेश दादजवार यांचा घरी ते व त्यांची पत्नी मुले घरी नसल्याची खात्री करून,मुलांसह त्याच्या मित्रांना भावाच्या घरी पाठवून  दिवसाढवळ्या दरोडा  टाकण्यात आला. दरम्यान काल अंदाचे 1 च्या सुमारास रमेश  दाचावार यांच्या घरी कोणीही पुरुष मंडळी नसल्याची खात्री करत त्यांचा पुतण्या श्रीनिवास व त्याच्या इतर मित्रांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या चुलत भावाच्या पत्नीला  व एक वर्षीय बाळाच्या गळ्यास सुरा लावून दागिने व रोकडसह लाखोंचा ऐवज लुटला. परंतु सदर घटनाक्रम आटोपून मुद्देमाल घेऊन परतत असताना आरोपी cctv कॅमऱ्यात  कैद झाले.परंतु  सदर घटनेनंतर पसार होणारे चोरटे घरा शेजारील cctv कॅमऱ्यात कैद झाले.आणि याच पुराव्याच्या आधारे व संशयावरून पोलिसांनी बारा तासात आरोपी श्रीनिवास दाचावार, कृष्णा मोरे, संजय मोरे, आकाश गोगदरे या आरोपींना 50 तोळे सोने व दोन लाख रुपये रोकड या मुद्देमाला सह ताब्यात घेतले.

या प्रकरणी रमेश दादजवार यांच्या तक्रारी वरून नांदेड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झालाय.परंतु सर्व घटनेला मूर्त रूप देणाऱ्या व या गुन्ह्यास खतपाणी घालणाऱ्या मुख्य सूत्रधार दिलीप दाचावार यांचे आरोपी म्हणून तक्रारीत नाव असतानाही यांच्यावर मात्र नांदेड ग्रामीण पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदवला नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Goverment : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह युतीचे नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावाDevendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणारDevendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोषSantosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
Embed widget