Nanded Crime : चार महिने काम करुनही मानधन मिळेना, तासिका तत्वावरील प्राध्यापकाचा कुलसचिवांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न
Nanded Crime : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय.
Nanded Crime : नांदेड जिल्ह्यातील (Nanded Crime) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा (Marathwada) विद्यापीठात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकाने कुलसचिवांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न प्रयत्न केलाय. विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्रात काम करूनही चार महिन्याचे पैसे न दिल्याचा आरोप प्राध्यापकाने केलाय. त्यामुळे त्यांनी कुलसचिवांच्या दालनात टोकांच पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. गजानन इंगोले व मेघनाथ खडके असं आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्राध्यापकांची नावं आहेत.
कुलसचिवांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
याबाबत अधिकची माहिती अशी की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्त्री अध्ययन केंद्रात तासिका तत्वावर प्राध्यापक गजानन इंगोले व मेघनाथ खडके यांनी काम केले आहे. मात्र या दोन्ही प्राध्यापकांचे चार महिन्याचे पैसे बाकी असल्याने, आज या प्राध्यापकांनी कुलसचिवांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. प्राध्यापकांनी उचललेल्या या पावलामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात खळबळ उडाली आहे.
राज्यभरात अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तासिका तत्वावर काम करत असतात. मात्र, अनेकदा तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन मिळण्यास विलंब झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत अनेक प्राध्यापक आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग देखील अवलंबताना दिसतात. मात्र, सरकारने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात 2022 मध्ये वाढ झाली होती.. राज्यातील शासकीय महाविद्यालये, संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये अनेक अद्यापक तासिका तत्वावर काम करतात... त्यांच्यासाठी हा मोठा आर्थिक दिलासा मानला गेला. मात्र, अद्यापही प्राध्यापकांना वेळेवर वेतन मिळणे कठीण झाले आहे.
प्रियकराने मानसिक त्रास दिल्याने वैमानिकाने जीवन संपवले
मुंबईच्या अंधेरीतील मरोळ परिसरात राहणाऱ्या एका उच्च शिक्षित वैमानिक मुलीने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून जीवन यात्रा संपवली आहे. प्रियकराने तिच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याचा तसेच मांसाहार केल्याने त्रास दिल्याचा आरोपही करण्यात येत आहे. दरम्यान, तरुण मुलीने प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचलतं जीवन यात्रा संपवल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होतं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Uday Samant: तुमचं नाव उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत; उदय सामंत म्हणाले, सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना!