एक्स्प्लोर

शासकीय नोकरीसाठी बापानं पोटच्या तिसऱ्या मुलीला विकलं, पत्नीला हाकलून दिलं, आठ वर्षांनतर शेवटी... नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार

Nanded Crime: माझ्या मुलांना माझ्याकडे सोपवण्यात यावे आणि पतीविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीये. पोलीसानी गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरनाचा तपास करताहेत.

Nanded Crime:शासकीय नोकरीसाठी एका बापाने स्वतःच्या तिसऱ्या मुलीला विकल्याचा प्रकार नांदेडमधून उघडकीस आला आहे . वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर शिपाई पदाची नोकरी गजानन वांजरखेडे यांना लागणार होती .पण सरकारी नोकरीसाठी तिसऱ्या आपत्त्याची अडचण येईल म्हणून पुढची मुलगी दुसऱ्याला देऊन टाकण्याचा विचार होता . यावरून आईने वाद घातला म्हणून तिलाही घराबाहेर हाकलून दिले .अखेर 8 वर्षांनंतर मुलीच्या आईला ही बाब कळल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .यावरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय .

नेमकं घडलं काय?

शासकीय नोकरीसाठी  बापाने आपल्या पोटच्या मुलीला विकल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. नांदेडमधील सुरेखा ह्या महिलेचा 2009 साली गजानन वांजरखेडे याच्याशी विवाह झाला होता. या दांपत्याला एक मुलगा आणि दोन मुली झाल्या. दरम्यान 2011 साली वांजरखेडे यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्याने गजानन वांजरखेडे यांना अनुकंपा तत्वावर 2018 मध्ये हिंगोली येथिल दुय्यम उनिबंधक कार्यालयात शिपाई पदाची नोकरी लागणार होती. नोकरीसाठी तिसऱ्या आपत्याची अडचण येईल म्हणून एक मुलगी दुसऱ्याला देण्याचा विचार होता. यावरून पती पत्नीत वाद झाला. पत्नीला घराबाहेर हाकलून दिले. काही महिन्यांपूर्वी आपल्या मुलीला एका नातेवाईकांना दिल्याची माहिती समजली. नंतर तपास केल्यानंतर मुलीच्या नावामागे दुसऱ्याच व्यक्तीचे नाव दिसले. मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप महिलेने केलाय.

शासकीय नोकरीसाठी मुलगी नकोशी झाली अन्..

या विषयावरून दोघा पती पत्नीमध्ये वाद झाला. पत्नी सुरेखा हिला घराबाहेर हाकलून देण्यात आले. तिन्ही मुले पतिकडेच होती. सुरेखा यांनी चार घरची घरी धुणी भांडी करून गुजरान केली. आपल्या शुभांगी नावाच्या मुलीला पतीने एका नातेवाईकाला दिल्याची माहिती काही महिन्यापूर्वी सुरेखा यांना समजली. कुठलाही आधार नसणाऱ्या सुरेखा यांनी एका वकिलांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना निराधार महिलांना मदत करणाऱ्या एनजीओबद्दल माहिती मिळाली.

एनजीओच्या टीमने ज्यांच्याकडे मुलगी आहे तिथे संपर्क केला. त्या गावातून मुलीच्या शाळेतील माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव दुसऱ्या व्यक्तीचे आढळले. मुलीचा जन्म ज्या रुग्णालयात झाला तिथून माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव वेगळे होते. एनजीओकडून  आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरेखा यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माझ्या मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप महिलेने केलाय. माझ्या मुलांना माझ्याकडे सोपवण्यात यावे आणि पतीविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीये. पोलीसानी गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरनाचा तपास करताहेत.

हेही वाचा

Baramati Crime News: 'शक्य असेल तर माझ्या मृत्यूनंतर...', बारामतीत बँक मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला दोर लावली; चिठ्ठीत लिहली शेवटची इच्छा

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget