आजार बरा करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाचा 23 वर्षीय तरुणीवर दीड वर्ष अत्याचार
आजार बरा करण्याच्या नावाखाली एका भोंदू बाबाने 23 वर्षीय तरुणीवर तब्बल दीड वर्ष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
वसई : आजार बरा करतो म्हणून पाच मुलांच्या ढोंगी बाबाने एका 23 वर्षीय युवतीला आपल्या वासंनाधतेची शिकार बनवलं आहे. तिचं धर्मपरिवर्तन करुन, तिच्याशी लग्नही केलं आणि तिच्यावर जळपास दीड वर्ष अत्याचार करत राहिला. पीडितेच्या घरच्यांना हा ढोंगी बाबा आपल्या ड्रायव्हरला तिचा पती म्हणून पुढे करायचा. मात्र, पीडितेच्या मोठ्या बहिणीने एका एनजीओला गाठून बाबाच पितळं उघड केलं. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्यात या मुस्लिम बाबावर, बाबाला मदत करणाऱ्या त्याच्या पत्नीवर तसेच त्याचा सहकारी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पोलिसांनी आतापर्यंत केवळ बाबालाच अटक केली आहे.
मुस्लिम बाबा आणि त्याची पत्नी यांना पाच मुलं आहेत. ह्याला दिसतही नाही. मात्र, झाडपाला आणि मंत्राने मंतरलेल्या ताविजने आपण लोकांना बरं करतो असा कांगवा करुन, तो लोकांना फसवायचा. अशा ढोंगी बाबाची शिकार उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे राहणारी एक 23 वर्षीय युवती झाली. पीडित युवतीची बहिण ही मिरा रोड येथे राहते. तिची तब्येत बरी नसल्याने तिने या बाबाचं झाडपाल्याचं औषध आणि मंतरेलेलं ताविज घेतलं आणि तिला बरं वाटलं. आणि तिने आपल्या वारणसीला राहणाऱ्या बहिणीला अशीच तब्येत खराब राहत असल्याने बाबाचा नंबर दिला.
मग काय बाबा आणि तिच्या पत्नीने आपल्या बोलबच्चनमध्ये फसवूण तिला उपचारासाठी नालासोपारा यावं लागेल असं सांगितलं. आणि तिला चक्क विमानाचं तिकिटही पाठवून दिलं. बाबा, बाबाची पत्नी, आणि ड्रायव्हर स्वतः तिला घ्यायाला एअरपोर्टवर गेले. पीडिता 26 जून 2020 ला नालासोपाराला बाबाच्या घरी आली. मात्र, बाबाने आपली वेगळीच नियत तिला दाखवली. बाबा, बाबाची पत्नी, त्याचा ड्रायव्हर आणि बाबाची पाच मुले अशी एकाच रुममध्ये राहू लागली. बाबा पीडितेला उपचाराच्या नावाखाली गुंगीचे औषध द्यायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. पीडितेने ही बाब, बाबाच्या पत्नीला सांगितल्यावर पत्नीने पीडितेलाच धमकी दिली. आणि पीडितेच्या घरच्यांना बाबाने मुलीने माझ्या ड्रायव्हर बरोबर लग्न केलं असून, ती खुश असल्याचं खोटं सांगितलं.
ढोंगी बाबाने पीडितेच धर्म परिवर्तन केलं. त्यानंतर तिच्याबरोबर लग्नही केलं. मात्र, पीडितेच्या घरच्यांना आपल्या ड्रायव्हरने लग्न केलं असल्याचं सांगायचा. आई आजारी असल्याचं सांगून पीडितेने वाराणसी गाठली आणि आपल्या मिरा रोड येथील बहिणीला सगळा प्रकार सांगितला. पीडितेच्या बहिणीने मिरा रोड येथील एनजीओना गाठून, तुळींज पोलीस ठाण्यात बाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेच्या तक्रारीवरुन तुळींज पोलीस ठाण्यात बाबा, बाबाची पत्नी आणि ड्रायव्हरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तुळींज पोलिसांनी बाबाला अटक केली आहे. तर बाबाची पत्नी आणि त्याचा ड्रायव्हर यांना अजून अटक केलेली नाही. तुळींज पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.