Nagpur : 'आयेगी याद तुम्हे मेरी वफाये...'अपहरण करुन हत्या झालेल्या 16 वर्षीय राज पांडेचा व्हिडीओ व्हायरल
राज पांडेने त्याच्या मित्रांच्या मैफिलीत काही दिवसांपूर्वी गायलेलं ते गीत सध्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणत आहे. दोन दिवसांपूर्वी राजचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली होती.
नागपूर : 'आयेगी याद तुम्हे मेरी वफाये...कभी भूल नही पाओगे...करोगे रो रो के फरीयाद.. तुम किसी को बता नही पाओगे'... अपहरण करुन हत्या करण्यात आलेल्या 16 वर्षाच्या राज पांडेने हे गीत मित्रांच्या मैफिलीत गायलं होतं. तेव्हा रिकॉर्ड केलेला व्हिडीओ काही दिवसांनी त्याच राजच्या आठवणी आणणारा ठरेल असा कदाचित कोणीच विचार केलेला नसावा. आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणतोय.
सुरज साहू नावाच्या 22 वर्षीय आरोपीने दहा जूनच्या संध्याकाळी 16 वर्षाच्या राज पांडेचे एकात्मता नगर परिसरातून अपहरण केले होतं. त्यानंतर घरापासून बावीस किलोमीटर लांब आऊटर रिंग रोड परिसरात एका निर्जन ठिकाणी नेऊन त्याची दगडाने ठेचून व हाताची नस कापून हत्या केली होती. सुरज शाहू हा व्यक्ती राज पांडेचा शेजारी होता.
हत्येपूर्वी सुरज साहूने राज पांडेच्या कुटुंबियांना फोन करुन त्याच्या काकाचे मुडकं कापून त्याचा फोटो पाठवा अशी खळबळजनक अट ठेवली होती.
तुझ्या दिराचं मुंडकं छाट आणि त्याचा फोटो मला व्हॉट्सअॅप वर टाक नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकीन, असं राज पांडेच्या आईला फोन करून धमकावणाऱ्या सुरज साहूने पंधरा वर्षांच्या राजचे अपहरण करून त्याला मारून टाकल्याची घटना नागपूरात घडली होती.
राजच्या काकाने काही वर्षाआधी आरोपीच्या आईवर अत्याचार केल्याचा सुरजचा समज होता आणि त्याच रागातून त्याने राजचे अपहरण करुन मोबदल्यात राजच्या काकाला मारावं अशी मागणी केली होती.
अपहरणाच्या फोननंतर राजच्या परिवाराने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मैदानात पडलेल्या दगडांनी राजला सूरजने मारून टाकलं होतं. तसेच सर्जिकल साहित्याचा वापर करुन राजच्या हाताच्या नसाही कापल्या होत्या. त्यात सूत्रांच्या माहितीनुसार समोर येते आहे की, जरी सुरजला असे वाटतं आहे की आईचे शोषण राजुच्या काकाने केले तरी त्याच्या आईने असे काहीही नसल्याचं सांगितले आहे. त्यामुळे एका निरागस मुलाचा अंत झाला आणि कारण हा फक्त डोक्यातला खेळ.
महत्वाच्या बातम्या :
- दिराचं मुंडकं छाटून त्याचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठव नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकीन अशी धमकी देत अल्पवयीन मुलाची हत्या
- Corona : कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची चिंता कायम, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक
- Buldhana : पेरणीसाठी पैसा नाही, बँका कर्ज देत नाहीत, आम्हाला किडनी विकायची परवानगी द्या; शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी