रेल्वे ट्रॅकवरील राफ्टर घेऊन प्लॅटफॉर्मवरील लोकांना मारत सुटला, दोघांचा जीव घेतला, नागपूर हादरलं!
Nagpur Railway Station Incident: नागपूर रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्ण व्यक्तीने डोक्यावर वार करुन हत्या केली.
![रेल्वे ट्रॅकवरील राफ्टर घेऊन प्लॅटफॉर्मवरील लोकांना मारत सुटला, दोघांचा जीव घेतला, नागपूर हादरलं! Nagpur Railway Station Incident Two people were killed by a mentally ill person at Nagpur railway station रेल्वे ट्रॅकवरील राफ्टर घेऊन प्लॅटफॉर्मवरील लोकांना मारत सुटला, दोघांचा जीव घेतला, नागपूर हादरलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/07/91ec5fa41c81edc547a2bcd76f9a41921728281180561987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur Railway Station Incident: नागपूरमधील एक धक्कादायक (Nagpur Crime News) घटना समोर आली आहे. नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर दोघांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण नागपूर रेल्वे स्थानक हादरलं आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्ण व्यक्तीने डोक्यावर वार करुन हत्या केली. सदर घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करून आरोपीला पकडलेजयराम रामअवतार केवट (वय-३५) असे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी रेल्वे स्थानकावर लोकांना मारत सुटला होता. रेल्वेच्या रुळात उपयोगात येणाऱ्या लाकडी राफ्टरने वार करत त्याने दोन जणांची हत्या केली. तर दोघं गंभीर जखमी झाले आहेत. गणेश कुमार डी-54 ( दिंडीगुल तामिळनाडू) हे एक मृत प्रवासी आहेत. तर दुसऱ्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भयानक प्रकार-
राज्याच्या उपराजधानीत रुग्णांच्या जीवाशी खेळ चालला आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. त्यामागील कारण म्हणजे नागपुरातील (Crime News) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या मेडिकलमध्येच चक्क बनावट औषधीचा पुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. तसेच या बनावट औषधीचे सेवन करणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात बनावट औषधांच्या खरेदी-विक्रीत चार कंपन्यांचे साटेलोटे असल्याचेही उघडकीस आले आहे. दरम्यान, या प्रकरणी बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या चारंही कंपन्यांचे मालक आणि संचालकांविरोधात अजनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच हा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
अकोल्यात भयावह घटना-
अकोलामधील बाळापूर परिसरात एका व्यक्तीने आपल्या दोन लहान मुलींना नदीत फेकून दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन्ही मुलींचा मृ्त्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलींच्या वडिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळापूर परिसरात दोन अल्पवयीन बहिणींना भीमकुंड नदीपत्रात पुलावरून फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी समोर आला होता. काल रात्री उशिरा दोघींचे मृतदेह शोध व बचाव पथकाच्या हाती लागले. आलिया आणि सदफ असे या दोघी मृत बहिणींचे नाव आहे. मृत मुलींच्या नातेवाईकांनीच म्हणजेच वडिलांनी हे कृत्य केल्याचा संशयदेखील पोलिसांना आहे. त्या आधारावर वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
संबंधित बातमी:
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)