एक्स्प्लोर

Nagpur News : फुग्यामध्ये गॅस भरणारा सिलिंडर फुटून हवेत उडाला, चिमुकल्याच्या डोक्यावर जाऊन आपटला, जागच्या जागी मृत्यू

Nagpur News : चार वर्षाचा मुलगा रविवारी रात्री नागपुरात फुग्यात गॅस भरणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटात मृत्युमुखी पडला. धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर बेकायदेशीर रित्या फुग्यांमध्ये गॅस भरून विक्रीचा काम करणारा फुगेवाला फक्त घटनास्थळावरूनच नाही तर त्याच्या घरातूनही कुटुंबासह फरार झाला आहे. 

नागपूर : यात्रा आणि यात्रेत येणारे रंगीबेरंगी फुगे (Balloon) हे लहान मुलांना आकर्षित करतात. पण हेच फुगे आणि या फुग्यात असलेला हेलियम गॅस जीवघेणाही ठरु शकतो. नागपुरातल्या  (Nagpur) सिव्हील लाईन परिसरात रविवारी एक दुर्दैवी घटना झाली. एका फुगे विक्रेत्याजवळचा सिलेंडर फुटला. स्फोट एवढा भीषण होता की सिलेंडर हवेत अनेक फूट उंचीपर्यंत फेकला गेला आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या शिजानच्या डोक्यावर कोसळला. या घटनेत शिजानसोबत त्याच्या कुटुंबातील इतर दोन महिलाही जखमी झाल्या. तिघांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी शिजानचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. धक्कादायक बाब म्हणजे मृत शिजान हा फुगेवाल्याच्या जवळ नव्हता. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा होता. तरीही या स्फोटात उडालेला सिलेंडर डोक्यावर कोसळून शिजानचा मृत्यू झाला. नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) अधिक तपास सुरू आहे.

प्रत्येक शहरात गर्दीच्या ठिकाणी फुगेविक्री करणारे कोणत्याही परवानगीशिवाय आणि प्रशिक्षणाशिवाय व्यवसाय करतात. त्यांच्याकडे असलेल्या सिलेंडरमध्ये नायट्रोजन किंवा हेलियम गॅस असतो. या सिलेंडरचा मेटेनन्सही केला जात नाही, त्यामुळं अशी फुगेविक्री जीवावर बेतू शकते. नागपुरातल्य़ा या दुर्दैवी घटनेनंतर तरी फुगेवाल्यांसदर्भात काही नियम तयार होतील अशी अपेक्षा आहे. जेणेकरुन पुन्हा अशी घटना घडू नये आणि अशी फुगेविक्री कुणाच्याही जीवावर बेतू नये.

फुगेवाला फरार -

नातेवाईकांसोबत बाजारात गेलेला शिजान आसिफ शेख हा चार वर्षाचा मुलगा रविवारी रात्री नागपुरात फुग्यात गॅस भरणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटात मृत्युमुखी पडला. धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर बेकायदेशीर रित्या फुग्यांमध्ये गॅस भरून विक्रीचा काम करणारा फुगेवाला फक्त घटनास्थळावरूनच नाही तर त्याच्या घरातूनही कुटुंबासह फरार झाला आहे. 

नेमकं घडलं काय ?

नागपूरातील सिविल लाईन्स परिसरात जुन्या व्हीसीए ग्राउंडजवळ काल रात्री अशाच एका फुगे विक्रेत्या जवळचा सिलेंडर फुटला. स्फोट एवढा जोराचा होता की सिलेंडर हवेत अनेक फूट उंचीपर्यंत फेकला गेला. आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंबीयांसोबत उभ्या असलेल्या शिजानच्या डोक्यावर कोसळला. या घटनेत शिजानसोबत त्याच्या कुटुंबातील इतर दोन महिलाही जखमी झाल्या.. तिघांना तातडीने मेयो शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र डॉक्टरांनी तपासून शिजानचा मृत्यू झाल्याचे सांगितले.  या स्फोटात फारिया हबीब शेख (वय 28 वर्षे),  अनमता हबीब शेख वय (24 वर्ष)  अशी जखमींची नावे आहेत.

तज्ञांनी काय सांगितलं ?

तज्ञांच्या मते प्रत्येकच शहरात गर्दीच्या ठिकाणी फुगे विक्रीचा व्यवसाय करणारे कोणत्याही परवान्याशिवाय आणि प्रशिक्षणाशिवाय व्यवसाय करत असतात. त्यांच्याकडील सिलेंडरमध्ये नायट्रोजन किंवा हेलियम गॅस असते. या सिलेंडरचे मेंटेनन्स केले जात नाही. त्यामुळे त्याचा स्फोट होणे किंवा गर्दीच्या ठिकाणी गॅस गळती होते. फक्त फुगे खरेदी करण्यासाठी आलेल्या लहान मुलांसाठीच नाही तर शिजानसारख्या निर्दोषांसाठीही धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने फुगेवाल्या संदर्भात काही नियम तयार करणे आवश्यक आहे. तसेच पालकांनीही फुगेवाल्यांच्या जवळ उभे असताना सावध राहण्याची गरज आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget