एक्स्प्लोर

Nagpur Crime : प्रेयसीवरील संशयातून व्हॅलेंटाईन डेलाच उपराजधानीत हत्येचा थरार; मित्राचीच केली भरदिवसा हत्या

Nagpur Crime News : देशभरात आज 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जात असताना उपराजधानीत प्रेयसीवरील संशयातून एकाची भर दिवसा हत्या केल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे.

नागपूर : देशभरात आज 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जात असताना उपराजधानीत प्रेयसीवरील संशयातून एकाची भर दिवसा हत्या (Nagpur Crime) केल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना आज, 14 फेब्रुवारीच्या दुपारी अजनी पोलीस (Nagpur Police) ठाण्यांतर्गत येणाऱ्या नाईक नगर येथे घडली. सुरज उर्फ ​​बिहारी महतो (बालाजी नगर) असे मृतकाचे नाव आहे. तर बिपीनकुमार गुप्ता (25, नाईक नगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्षाला मिळताच या हत्येत सहभागी असलेल्या मारेकऱ्याला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने स्वतः पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भरदिवसा झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा नागपूर शहर हादरले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 12 दिवसांत शहरातील हत्येची ही दहावी घटना आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

12 दिवसांत शहरातील हत्येची दहावी घटना 

उपराजधानीत फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून एका पाठोपाठ हत्येच्या घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. गेल्या 12 दिवसांत शहरातील हत्येची आज दहावी घटना घडली आहे. नवे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पदभार स्वीकारताच नागपूरातील गुन्हेगारांनी पुन्हा तोंड वर काढले असून नागपूर पोलिसांना या हत्येच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भरदिवसा एका गुन्हेगाराच्या निर्घृण हत्येनंतर बुधवारी नागपूर शहर पुन्हा हादरले. प्राप्त माहितीनुसार, मृतक सूरज उर्फ ​​बिहारी अमीर महतो हा बालाजी नगर परिसरात राहतो. मृतक सुरज हा एक गुंड प्रवृत्तीचा असुन त्याच्यावर सुमारे 21 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. ऑगस्ट 2023 मध्येच त्याची नागपूर शहर आणि ग्रामीण भागातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र तरी देखील तो शहरातच राहत होता.

प्रेयसीवरील संशयावरून मित्राची हत्या

मृतक सुरज आणि संशयित आरोपी बिपीनकुमार गुप्ता हे मित्र होते. सूरज आणि बिपिन कुमार दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून ते काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात नागपूरात आले होते. दरम्यान, सुरजची बिपिनच्या प्रेयसीशी मैत्री होती. गेल्या काही दिवसांपासून बिपीनला दोघांवर संशय आला. बिपिनने त्याचा प्रेयसीला सुरजसोबत मैत्री तोडण्यासाठी सांगितले, मात्र तिने नकार दिला. सुरजमुळे आपली प्रेयसी आपल्या सोबत बोलत नसल्याचा संशय बिपिनला आला.  

त्यामुळे बुधवारी बिपिनने सूरजला भांडण सोडवण्यासाठी बोलावले. सुरज हा दुचाकीवरून नाईकनगर चौकात येताच बिपीन आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर चाकुने वार केले. सूरज जीव वाचवण्यासाठी धावू लागला. त्यानंतर सूरजने  नाईक नगर येथील विठ्ठलराव सिरसाठ यांच्या घरात शिरत मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. मात्र, संशयित आरोपींनी सूरजची गळ्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली.

मारेकऱ्याला अटक

या हत्येच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर जवळच कर्तव्यावर असलेले वाहतूक एएसआय कमलकांत रोकडे यांना एका ऑटोचालकाने नाईक नगर गल्लीत एका तरुणाला काही लोक मारहाण करत असल्याचे सांगितले. या माहितीवरून कमलकांत त्यांच्या महिला सहकारी संध्या ढोक यांच्यासह त्यांच्या दुचाकीवर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना एक पल्सर गाडी रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. काही अंतर गेल्यावर त्यांना विठ्ठलराव सिरसाठ नावाच्या व्यक्तीच्या घरात एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला.

लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मारेकरी नुकताच येथून पळून गेला होता, त्यानंतर कमलकांत रोकडे यांनी थोड्या अंतरावर जाऊन मारेकरी  बिपीन गुप्ता याला पकडले. त्यांनंतर त्याने साथीदारांसह हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर कमलकांत यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून मृतक सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amol Kolhe : शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभारEknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Embed widget