Nagpur Crime News : धक्कादायक! चोरट्यांनी भर चौकातील एटीएम गॅस कटरने फोडलं; दहा लाखांची रोकड केली लंपास
Nagpur News : सावनेर शहरात भर चौकात असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nagpur News : सावनेर (Saoner) शहरात भर चौकात असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम (ATM) गॅस कटरच्या साहाय्याने फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमध्ये (Robbery) आज्ञातांनी एटीएममधून 10 लाख 30 हजारांची रोकड लंपास केली. ही खळबळजनक घटना मंगळवार, 30 जानेवारीच्या पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली. हा सर्व चोरीचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून कारमधून आलेल्या चार ते पाच अज्ञातांनी हे एटीएम फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
विशेष बाब म्हणजे, बँक व्यवस्थापनाने एसबीआय (SBI) एटीएममध्ये घटनेच्या रात्रीच कॅश टाकली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. सध्या राज्यात बाहेर राज्यातील टोळी सक्रिय असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने पोलिसांनी तपास पथक नेमून पुढील तपास सुरू केला आहे.
10 लाख 36 हजार रुपयांची रोकड केली लंपास
सावनेर शहरातील तेलीपुरा बाजार चौक हा कायम लोकांच्या गर्दीने गजबजलेला परिसर आहे. याच परिसरात भर चौकात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. त्यामुळे चोरी केल्यानंतर मुख्य रस्त्याने पळ काढणे सहज शक्य असल्याने चोरट्यांनी एटीएमवर डाव साधला. त्या पूर्वीच एटीएमची पाहणी करून 30 जानेवारीच्या पहाटे चार ते पाच अज्ञात व्यक्ति कारमधून आले. सोबत त्यांनी हातात धारदार शस्त्र आणि इतर साहित्य घेत एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एटीएम फोडून त्यातील रोकड लंपास किली.
सकाळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पाहणी आणि पंचनामा केला. शिवाय, बँकेच्या अधिकाऱ्यांनाही बोलाविण्यात आले. चोरट्यांनी या मशीनमधून 10 लाख 36 हजार रुपये चोरून नेल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली. या चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
आवाज झाला आणि चोरट्यांनी पळ ठोकला
सावनेर शहरातील बहुतांश एमटीएमच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. सुरक्षेसाठी केवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र, चोरटे अनेक उपाययोजना करून त्यांनाही निकामी करतात. त्यामुळे बरेचदा या आरोपींची शोध घेण्यास विलंब होत असतो. ही चोरी करण्यापूर्वी या टोळीने सावनेर शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या बसवार कॉम्प्लेक्स मधील एचडीएफसी बँकेच्या एटीएमवर देखील डाव साधण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास या मशीन आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी 3-4 वाजताच्या सुमारास त्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. आत गेल्यावर एक कॅमेरा सेंट्रल व्हिजिलन्सच्या 24 तास नजरेत असल्याने येथे लागलेल्या स्पीकरवर काय करतोय म्हणून आवाज आला आणि चोरट्यांनी पळ काढला. त्यामुळे एचडीएफसी बँकेचे एटीएम थोडक्यात वाचले.
इतर महत्वाच्या बातम्या
Nagpur Crime News : हत्या प्रकरणातील दोषी पॅरोलवर सुटला, मायलेकींच्या अब्रूवरच हात घातला