Nagpur Crime : नागपुरातील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक; बनावट कागदपत्रे अन् खोटा स्टॉक दाखवत 9 कोटी रुपयांचा गंडा
Nagpur Crime News : नागपुरातील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची (Haldiram Group) कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

Nagpur Crime News: नागपुरातील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची (Haldiram Group) कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील चार व्यापाऱ्यांनी हल्दीराम समूहाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Nagpur Crime News) केली असल्याची माहिती समोर आली आहे. आरोप लागलेल्या व्यापाऱ्यांनी हल्दीराम समूहाला त्यांच्या कंपनीची बनावट कागदपत्रे आणि त्या कंपनीचा खोटा स्टॉक दाखवत सुमारे नऊ कोटी रुपयांचा गंडा (Crime News) घातला आहे.
बनावट कागदपत्रे अन् खोटा स्टॉक दाखवत 9 कोटी रुपयांचा गंडा
पुढे आलेल्या माहितीनुसार, समीर अब्दुल हुसेन लालानी, त्याची पत्नी हिना समीर लालानी, मुलगा आलिशान समीर लालानी, आणि भागीदार प्रकाश भोसले अशी आरोप लागलेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. या चौघांनी सुक्या मेव्यावर प्रक्रिया करणारी 'रॉयल फूड इंडस्ट्री' त्यांच्या मालकीची असल्याचे सांगितले आणि कंपनी दरवर्षी 15 कोटी रुपयांची उलाढाल करत असल्याचे सांगून आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कच्चा माल असल्याचे दर्शवणारी कागदपत्रे तयार केली. हल्दीराम समूहाने त्या आधारावर रॉयल फूड इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले. आरोपींनी हल्दीराम समूहाला गुंतवणुकीच्या बदल्यात त्यांच्या समभागात (शेअर्स) ठराविक वाटा देण्याचे आमिष दाखविले. मात्र, गुंतवणूक करूनही हल्दीराम समूहाला रॉयल फूड इंडस्ट्रीजमध्ये हवा असलेला समभागातील वाटा मिळाला नाही. त्यानंतर हल्दीराम समूहाच्या अधिकाऱ्यांनी नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दिली आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही केली जात आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
14 जुलै रोजी विदर्भातील सर्व बार परमिट रूम बंद ठेवण्याचा निर्णय
राज्य सरकारने महाराष्ट्रातील बार व परमिट रूमवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याविरुद्ध 14 जुलै रोजी विदर्भातील सर्व बार परमिट रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन तर्फे 14 जुलै रोजी बार बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास बार परमिट रूम बंद करून चाव्या जिल्हाधिकारी यांना सोपविण्यात येणार असल्याचे ही बार परमिट रूम संघटनेचे म्हणणे आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिलीय.
सरकारने वॅट नूतनीकरण फी तसेच वाढवलेली एक्साईज ड्युटी कमी करावी, या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदने दिली.त्यांनी प्रत्येक वेळेला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आमचे आंदोलन करण्याची वेळ आल्याची माहिती नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























