Nagpur Crime: नागपुरात रक्ताचा सडा, सहा दिवसांत 6 जणांना संपवलं, गुन्हेगारीनं कळस गाठला
दिवसाढवळ्या चाकूने भोसकलं, पैशांची मागणी करत दगडाने ठेचून खून, गळ्यावर चाकूहल्ला असे जीवघेणे हल्ले शहरात वाढले असून गेल्या सहा दिवसात सहा हत्येच्या घटनांनी नागपूर जिल्हा हादरला आहे.
Nagpur Crime: राज्यात गुन्हेगारीनं कळस गाठला असून मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या,परळीत गोळीबार,अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असतानाच नागपूर शहर हत्या शहरातून घडलेल्या सहा खुनांच्या घटनां संपूर्ण शहर हादरले आहे. रविवारी एकाच दिवशी हत्येच्या दोन घटना घडल्याने शहरासह परिसरात भीतीचं वातावरण आहे. वैयक्तीक कारणासह किरकोळ कारणांमधून या हत्या झाल्याचं उघड झालं आहे. दिवसाढवळ्या चाकूने भोसकलं, पैशांची मागणी करत दगडाने ठेचून खून, गळ्यावर चाकूहल्ला असे जीवघेणे हल्ले शहरात वाढले असून गेल्या सहा दिवसात सहा हत्येच्या घटनांनी नागपूर जिल्हा हादरला आहे. दिवसाढवळ्या चाकूहल्ले, जीवघेणे हल्ले करत खून होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे उभे राहत आहे.
पहिली हत्या -
25 डिसेंबर 2024
24 डिसेंबर रोजी कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत आदिवासीनगरमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सचिन गुप्तावर जीवघेणा हल्ला झाला होता... 25 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान सचिन गुप्ताचा मृत्यू...
दुसरी हत्या -
26 डिसेंबर 2024 संध्याकाळी 6.30 ते रात्री 12:30 दरम्यान अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत कुलदीप चव्हाण नावाच्या तरुणाची रिकेश शिक्कलवार या त्याच्या मित्राने दगडाने ठेचून हत्या केली होती.. आरोपी एका जुन्या हत्या प्रकरणात तुरुंगातून सुटून आल्यानंतर कुलदीप चव्हाण कडे पैशाची मागणी करत होता, त्याच वादतून ही हत्या झाली होती
तिसरी हत्या -
27 डिसेंबर 2024 रोजी
रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास धंतोली पोलीस स्टेशन अंतर्गत लुटमारीच्या उद्देशातून ऑटो चालकाने धारधार शस्त्राने वार करून केली एका अज्ञात्याची हत्या केली होती.. मृतक कुंभार टोली परिसरात एका रस्त्यावर मृत अवस्थेत आढळून आल्यानंतर घटना उघडली झाली होती...
चवथी हत्या -
29 डिसेंबर 2024 दुपारी 3 च्या सुमारास जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत दफन भूमीच्या 67 वर्षीय चौकीदार रमेश शिंदे याची दफनभूमीतच गळा चिरून आणि डोक्यावर दगडाने वार करून केली हत्या.. एनोन पियारजी या आरोपी ला दफनभूमीवर हजर असलेल्या लोकांनीच पकडून पोलिसांचे स्वाधीन केले होते...
पाचवी आणि सहावी हत्या -
29 डिसेंबर 2024 म्हणजेच काल रात्री गांधीबाग परिसरातील काली माता मंदिर समोर पैशाच्या वादातून रवी आणि दीपक राठोड या दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्रानी हत्या करण्यात आली... याप्रकरणी पोलिसांनी हत्या करणाऱ्या आणि मृतकांचा दूरचा मामा बदनसिंह राठोड व त्याच्या दोन मुलांना अटक केली आहे तर दोन आरोपी फरार आहेत..
हेही वाचा: