Nagpur Crime : शहरात धाडसी चोरी, मुख्य मार्गावरील स्टेट बँकेचे एटीएम न फोडता रक्कम लंपास
एसबीआय बँकेचे एटीएमची तोडफोड न करता साडेपाच लाखापेक्षा जास्त रक्कम लांबवण्यात आल्याने आणि एटीएमची कोणतीही तोडफोड न करता त्यातून एवढी मोठी रक्कम कशी काढण्यात आली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे
नागपूरः परिसरात अनेक मोठे रुग्णालय, 24 तास सुरु असणारे मेडिकल स्टोअर तसेच मध्यरात्रीपासून होणारी वृत्तपत्र विदर्भात पाठविण्याची साखळी सक्रिय असताना नागपूरातील रामदासपेठेतील वर्धा रोडवरील स्टेट बँकेच्या एटीमधून पावणेसहा लाखाची रोकड लंपास करण्यात आली आहे. हे एटीएम मुख्य मार्गावरील असून येथे परिसरात रात्री 24 तास वर्दळ असते. शिवाय परिसरात अनेक मोठे हॉस्पिटल आणि मेडिकल स्टोअर असल्याने एटीएममधून पैसे काढणाऱ्यांचाही गर्दी असते, हे विशेष.
Shivsena Sanjay Raut : ईडीच्या छाप्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांचे ट्वीट, म्हणाले...
एटीएम न फोडता चोरी कशी?
एसबीआय बँकेचे एटीएमची तोडफोड न करता साडेपाच लाखापेक्षा जास्त रक्कम लांबवण्यात आल्याने आणि एटीएमची कोणतीही तोडफोड न करता त्यातून एवढी मोठी रक्कम कशी काढण्यात आली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरु केली आहे. यासंदर्भातील काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून त्यादिशेने तपास सुरु असल्याची माहिती आहे.
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी उद्याऐवजी आता 3 ऑगस्टला
चोरटे नियंत्रणाबाहेर
नागपूर शहरातील रामदास पेठ हे ठिाकाण नेहमीच वर्दळीचे राहिले आह, त्यामुळे भरदिवसा या ठिकाणी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एसबीआय बँकेचे एटीएम न फोडता त्यातील सर्वच रक्कम चोरट्यांनी लांबविल्याने तपासाची चक्रे आता वेगाने फिरवण्यात आली आहेत. या चोरीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी शोध पथकं नेमून चोरट्यांचा शोध चालू केला आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांनी शहरातील वाढत्या चोरीच्या घटांवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी शहरवासियांकडून करण्यात येत आहे.