एक्स्प्लोर

Nagpur Crime: बाईकस्वाराला कारने उडवलं, हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या बहाण्याने गाडीत टाकलं अन् पुलावरुन ढकलून दिलं, नागपूर हादरलं

असंवेदनशीलतेचा कळस! भरधाव कारचालकाने कामगाराला उडवले, दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने नेलं अन् वाटेतच पुलाखाली फेकून दिलं, कामगाराचा मृत्यू

Nagpur Crime: दुचाकीवरील कामगाराला धडक देऊन जखमी केल्यानंतर एका कारचालकाने असंवेदनशीलतेचा कळसच गाठला. जखमीला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने कारमध्ये टाकले व काही अंतरावर पुलाखाली फेकून दिले. वेळेवर उपचार न मिळाल्याने कामगाराचा मृत्यू झालाय. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडलीय. कृष्णा बुलसे असे मृत कामगाराचे नाव असून बांधकाम कामगार असलेले रुपेश वाकळे आणि कृष्णा बुलके हे दोघेही गुमगाव येथे बांधकामाच्या ठिकाणी भेट द्यायला गेले होते.  तेंव्हा ही घटना घडली आहे. जखमी झालेले दोन्हीही कामगार रुग्णालयात नसल्याचे उघड झाल्यानंतर शोधाशोध झाली. पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली तेंव्हा चिंचभुवन पुलाखाली पहाटे चारच्या सुमारास कामगार निपचीत पडलेला दिसला. तेंव्हा ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहर हादरले आहे. (Nagpur Crime) 

नक्की काय झाले?

सोमवारी सायंकाळी आठ वाजता बांधकाम कामगार असलेले कृष्णा बुलके आणि रुपेश वाकळे दुचाकीने परत जात होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटजवळ एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात कृष्णा जखमी झाले व त्यांच्या डोक्याला मार बसला होता. तेथे नागरिकांची गर्दी जमल्याने कारचालकाने उपचाराच्या बहाण्याने कृष्णाला कारमध्ये टाकले. मात्र चिंचभुवन पुलाजवळ गेल्यावर त्याने कार खाली घेतली व कृष्णाला कारमधून फेकून दिले. त्यानंतर कारचालक तेथून फरार झाला. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर हादरले आहे.  

दरम्यान रुपेशने पोलिसांना फोनवर झालेल्या अपघाताची माहिती दिली होती. पोलिसांनी शोधाशोध केली असता जखमी कृष्णा मेयो, मेडिकल, एम्स किंवा इतर कुठल्याही रुग्णालयात दाखल नसल्याची बाब समोर आली. पोलीस त्याचा शोध घेत असताना पहाटे चार वाजताच्या सुमारास चिंचभुवन पुलाखाली ते निपचित पडलेला आढळला. पोलिसांनी त्यांना इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी कारचालकाचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पडताळले जात आहे.

हेही वाचा:

Jalna Crime News: सासूचं डोकं पकडत भिंतीवर धडाधड आपटले; मृतदेह गोणीत टाकून सून फरार, जालन्यात भयावह घटना

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
Embed widget