Nagpur : कंपनीतील बॉसगिरीला वैतागले, आयटी कंपनीतील सहाय्यक व्यवस्थापकाची सहकाऱ्यांकडून हत्या
Nagpur Crime : आरोपींनी त्यांच्या सीनियरची हत्या केली आणि तो अपघात असल्याचा बनाव केला. पण पोलीस तपासात सत्य उघड झाले.
नागपूर : शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयटी कंपनीतील एका सहायक व्यवस्थापकाची त्याच्याच सहकाऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या (Nagpur Murder) केली. कंपनीतील त्याच्या बॉसिंगला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले. सुरुवातीला आरोपींनी त्याचा अपघात झाल्याचा बनाव केला. मात्र चौकशीतून सत्य उघडकीस आले.
एन.आर. लक्ष्मीनरसिंहम उर्फ देवनाथन असे मृतकाचे नाव आहे. ते मिहान येथील हेक्सावेअर टेक्नॉलॉजी येथे 10 महिन्यांपासून सहायक व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. ते मनिषनगरातील अग्निरथ संकुल येथे राहत होते. त्यांच्या कंपनीत गौरव भीमसेन चंदेल आणि पवन अनिल गुप्ता हेदेखील काम करत होते. त्यातील पवन हा देवनाथन यांचा रूम पार्टनरदेखील होता. दोघेही कामात अनेकदा चुका करायचे आणि वरिष्ठ असल्यामुळे देवनाथन त्यांना रागवायचे. यामुळे दोन्ही आरोपींना अपमानित वाटत होते. त्यानंतर त्यांनी ही हत्या केली.
गॅस सिलेंडर लीक करून चक्क पत्नी-मुलांना जाळण्याचा प्रयत्न
घरातील किरकोळ वादातून संतापलेल्या एका व्यक्तीने चक्क आपल्या पत्नी आणि मुलांना एका खोलीत बंद करून गॅस सिलेंडर लीक करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. मात्र त्याच्या पत्नीने वेळीच समयसूचकता दाखवत आरडाओरड केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. ही थरारक घटना नागपूरच्या कोराडी पोलीस (Nagpur News) ठाण्याच्या हद्दीतील ओमनगरमधील जगनाडे ले-आऊट भागात घडली आहे. या प्रकरणी आत्मघातकी (Nagpur Crime) प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
गॅस सिलेंडर लीक करून चक्क पत्नी-मुलांना जाळण्याचा प्रयत्न
रंजन गणेशप्रसाद शाव (वय 43, रा. युनिक शैलपुत्री अपार्टमेंट), असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. तर रंजनच्या पत्नी मीनू (वय 43), त्यांचा 14 वर्षीय मुलगा आणि आठ वर्षीय मुलगी, अशी थोडक्यात बचावलेल्यांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रंजन हे एका को-ऑपरेटिव्ह बँकेत मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा तापट स्वभाव असल्याने यापूर्वी देखील त्यांचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला होता. त्यानंतर हा वाद विकोपाल जाऊन रंजन यांनी आपल्या पत्नी मीनूला मारहाण देखील केली होती.
सोमवारच्या दुपारी त्यांच्यात परत एकदा काही कारणातून वाद उफाळून आला. त्यानंतर रंजन यांनी रागाच्या भरात घरातील गॅस सिलेंडरचा पाइप काढला आणि पत्नी मीनू आणि त्यांच्या दोन मुलांना एका खोलीत डांबले. त्यानंतर हातात माचिस घेऊन रंजन यांनी 'तिघांना संपवूनच टाकतो' अशी धमकी दिली. अल्पावधीतच घरभर गॅस पसरला आणि भीतीपोटी मीनू आणि त्यांच्या दोन मुलांनी आरडाओरड सुरू केली. सोबतच आपल्या भावाला देखील याबाबत कळवले.
ही बातमी वाचा: