Nagpur Accident : दुभाजकावर आदळून रिक्षा उलटली, नागपुरातील अपघातात माय-लेकाचा दुर्दैवी अंत
Nagpur Accident : रिक्षा दुभाजकावर आदळल्याने नागपूरमध्ये माय-लेकाचा दुर्दैवी अंत झालाय.
Nagpur Accident : नागपूरमधील रिक्षा अपघातात माय लेकाचा दुर्दैवी अंत झालाय. रिक्षाची दुभाजकाला घडक बसली आणि पलटी झाला. यातच खासगी कार्यक्रमावरुन येत असलेल्या माय-लेकाने जीव गमावलाय. ही घटना आज (दि.27) नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आटो चालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.
खासगी कार्यक्रमावरुन येत असाताना रिक्षाची डिव्हायडरला धडक बसली
अधिकची माहिती अशी की, एका खासगी कार्यक्रमावरुन येत असाताना रिक्षाची डिव्हायडरला धडक बसली. या अपघातात माय-लेकाचा मृत्यू झालाय. हिंगणा-वाडी बायपासवर मध्यरात्री 12 वाजता प्लास्टो कंपनी समोर आटो चालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे एक खाजगी कार्यक्रम आटोपून घरी जात असताना ही घटना घडली आहे. ऑटोवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ऑटो आधी दुभाजकावर आदळला व उलटला यात चालक रोहित व मागच्या प्रवासी सीटवर बसलेली त्याची आई करुणा दोघांनाही डोक्यावर व हातापायाला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना? #beed #beedcrime https://t.co/7w5AzYadPW
— ABP माझा (@abpmajhatv) December 27, 2024
बाळापुरजवळील भीकुंड नदीच्या पुलावरुन खासगी बस कोसळली
दरम्यान, अकोला जिल्ह्यातील बाळापूरनजीक लक्झरी बस पुलावरून खाली कोसळलीय. भिकूंड नदीच्या पुलावर हा अपघात घडलाय. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडलीय. बसमधील सर्व प्रवासी हे वाशिम येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहेय. बसमधील प्रवासी हे अयोध्येवरून परत येत होतेय. बाळापुरजवळील भीकुंड नदीच्या पुलावर या खासगी बसचा ब्रेक न लागल्याने सदर बस ही पुलावरून नदीत कोसळलीय. या घटनेत कुठलीच जीवित हानी झाली नसून 50 प्रवासी सुखरूप आहेयेत. यात काहींना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती प्राप्त होत आहेय. घटनेची माहिती मिळताच बाळापुर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात नेण्याचे कार्य सुरू होते.
Prakash Mahajan : बीडमधील शस्त्राचे क्रूर प्रदर्शन पाहिल्यानंतर प्रकाश महाजनांचा मोठा निर्णय, स्वत: जवळील बंदूक शासनाला परत करणारhttps://t.co/f29Z9fc7eh
— ABP माझा (@abpmajhatv) December 27, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या