राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 16 वर्षीय बालकाने केला 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, वसईतील संतापजनक प्रकार
Mumbai Vasai Virar Crime : बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्यांकडून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती वसईच्या नायगाव मध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे.
![राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 16 वर्षीय बालकाने केला 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, वसईतील संतापजनक प्रकार Mumbai Vasai Virar Minor Abuse Crime Case16 year old boy molested a 7 year old girl shocking incident in Vasai maharashtra marathi news राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 16 वर्षीय बालकाने केला 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, वसईतील संतापजनक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/24/39efd64c60f94cba8403178e1a1941b61724498560212892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Vasai Virar Crime : बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्यांकडून झालेल्या लैंगिक अत्याचार (Badlapur Minor Abuse Case) प्रकरणाची पुनरावृत्ती वसईच्या (Vasai Virar Crime) नायगाव मध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. नायगावच्या (Naigaon) एका शाळेच्या उपहागृहात काम करणार्या 16 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने 7 वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 वेळा लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केला आहे.
याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे. बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, आता राज्यातील इतर अनेक भागातून देखील सातत्याने अशाच घटना पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय.
विधिसंघर्षग्रस्त बालकाला पॉक्सोच्या गुन्ह्याखाली अटक
दरम्यान, या प्रकरणातील पीडित मुलगी या शाळेत दुसर्या इयत्तेत शिकते. 22 ऑगस्ट रोजी ती शाळेतील कॅंटीनमध्ये जाण्यास तयार नव्हती. कॅंटीनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देतो, असे तिने शिक्षिकेला सांगितल्यानतंर हा प्रकार शिक्षिकेने मुख्याध्यापकांना सांगितला. त्यांनी लगेच या मुलीची विचारूपस केली तेव्हा मागील 15 दिवसांमध्ये शाळेच्या आवारात उपहारगृह (कॅंटीन) मध्ये काम करणारा 16 वर्षीय तरुण या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे, एकदा मुलीने आपल्या घरी देखील याची माहिती दिली होती. परंतु त्यांनी हे प्रकरण तेव्हा गांभिर्याने घेतले नव्हते. मुख्याध्यापक यांनी त्वरीत याबाबतची माहिती नायगाव पोलिसांना दिली. या प्रकरणाची माहिती मिळातीच आम्ही आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला पॉक्सोच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे, अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.
चिमूकल्याच्या गुप्तांगावर दिले गरम चाकूने चटके
वसईतील एका सावत्र आईनेच दोन लाहानग्यावर घरात अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. यात घरातील भांडी घासणे, फरशी पुसणे, झाडू मारणे यासाठी सावत्र आईने दोन अल्पवयीन मुलावर लोखंडी पकडीने, पोळी लाटण्याच्या लाटण्याने मारहाण केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका 7 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटके दिल्याचा प्रकार देखील घडला आहे. ही घटना वडिलांना कळल्यावर वडीलांनीच सावत्र आई विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळेपाठोपाठ रहात्या घरात ही अल्पवयीन मुलं असुरक्षित असल्याचे वसईच्या वालीव येथील घटनेवरून समोरं आले आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)