एक्स्प्लोर

Mumbai: पहाटे चार वाजता नाश्त्याची ऑर्डर... टीप मिळाली आणि मुंबई पोलिसांनी केला बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 47 जणांना अटक

Fake Call Centre: यामागे मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याचा संशय असून पोलिस त्याचा तपास करत आहेत. 

मुंबई: केवळ नाश्ता देण्याच्या ऑर्डरवरुन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका बनावट कॉल सेंटरचा (Fake Call Centre) पर्दाफाश केला आहे. या बनावट कॉल सेंटरवर कारवाई करत पोलिसांनी 47 जणांना अटक केली असून मोठा डेटा जप्त केला आहे. या कॉल सेंटरमधून जवळच्या एका विशिष्ट हॉटेलमधून पहाटे चार वाजता नाश्ता ऑर्डर केला जायचा. त्या आधारे पोलिसांनी माग घेतला. मुंबई शहराच्या बाहेर असलेल्या राजोरी बीच या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली. 

या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना संबंधित बिल्डिंग सोडून जाण्याची मनाई होती आणि बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधू दिला जायचा नाही. पण या सेंटरमधील कर्मचाऱ्यांसाठी रोज पहाटे चार वाजता जवळच्या एका विशिष्ट हॉटेलमध्ये नाश्त्याची ऑर्डर दिली जायची. 

पोलिसांना माहिती मिळाली की, या सेंटरमधून कोणीतरी जवळच्या हॉटेलमध्ये रोज मोठ्या प्रमाणात नाश्ता ऑर्डर करत आहे, तेही पहाटे 4 वाजता. या बीचच्या ठिकाणी वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी असते, पण इतर वेळी मात्र हे ठिकाण निर्जन असतं. त्यामुळे या ठिकाणी काहीतरी अवैध गोष्ट सुरू असल्याचा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या जागेवर लक्ष ठेवणे सुरू केले. 

अनेक दिवसांपासून दररोज पहाटे देण्यात येत असलेल्या 50 ते 60 चहा-नाश्त्याच्या ऑर्डरमुळे पोलिसांचा संशय वाढला आणि पोलिसांनी त्या जागेवर गुप्तपणे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. नंतर पोलिसांनी या सेंटरवर छापा टाकून मालकासह 47 कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणूक, तोतयागिरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रातील जप्त केलेल्या संगणकांचीही फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचार्‍यांना ऑस्ट्रेलियातील संशयित बँक ग्राहकांचे कॉल रिसिव्ह करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या ठिकाणी पोलिसांना अनेकांची संवेदनशील वैयक्तिक तपशील आणि  वन-टाइम पासवर्डसह सुरक्षा माहिती मिळाली. पोलिसांना मिळालेली माहिती ही  हिमनगाचे टोक असू शकते. या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता असून पोलिस त्याचा तपास करत आहेत. 

मुंबईत अशा प्रकारचे अनेक बनावट कॉल सेंटर सुरु असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारे कुठे अवैध गोष्टी सुरू असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget