(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cruise Drugs Party: छापा मारण्यासाठी छुप्या पद्धतीनं क्रुझवर पोहोचले NCBचे अधिकारी, नेमकं काय काय घडलं?
Mumbai NCB Raid LIVE : एनसीबीनं (NCB) काल रात्री क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर (drugs case) छापा मारला. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. रात्रीपासून आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Mumbai NCB Raid LIVE Update: मुंबईतील ड्रग्ज रॅकेट्स (drugs case) काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. एनसीबीनं (NCB) काल रात्री एका क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली. या दोन महिलांचा समावेश आहे. तर एका बड्या अभिनेत्याचा मुलगा यात सहभागी असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आठ लोकांना अटक केली आहे.
एनसीबीच्या सूत्रांनुसार हे ड्रग्ज पॅन्ट, कॉलरच्या शिलाई असलेल्या भागात लपवून आणलं गेलं होतं. सोबतच महिलांकडून पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणली गेली होती. कारण, हॅंडल हे मुख्यत: स्टील किंवा लोखंडी असतात. अशावेळी मेटल डिटेक्टरमध्ये लक्षात येत नाही. अंडरवेअरच्या शिलाईत देखील ड्रग्ज बाळगलं गेलं होतं.
Mumbai NCB Raid: मोठं अपडेट! क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आठ जणांना एनसीबीकडून अटक
नेमकं काय काय घडलं?
सकाळच्या सुमारास एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून क्रूजवर रेड करण्यासाठी तयारी करण्यात आली
सकाळी 11 ते दुपारी 1 च्या सुमारास एनसीबीचे अधिकारी क्रूजवर दाखल
दुपारच्या सुमारास पार्टी सुरु झाल्यानंतर छुप्या पद्धतीनं शिरलेले अधिकाऱ्यांकडून रेडला सुरुवात
मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त, ज्यात चरस, कोकेन, एमडीएमए कॅप्सूल, एमडी ड्रग्ज सापडलेत
अनेक गेस्टच्या रुममधून रोल पेपर मिळालेत. जे मुख्यत: हे ड्रग्ज घेण्यासाठी कामी येतात.
दुपारी 4 च्या सुमारास क्रूझ निघणार होती. मात्र, थांबवण्यात आली. अनेक प्रवाश्यांचे बोर्डिंग पासेस रखडले आहेत.
रात्रीच्या सुमारास बाहेर असलेल्या प्रवाश्यांना तांत्रिक कारणांमुळे क्रूझ समुद्रात जाणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रात्री 10च्यानंतर बोर्डिंग पास नसलेले प्रवाशी बाहेर पडू लागले.
रात्री 11च्या सुमारास एनसीबीकडून ताब्यात घेतलेल्यांना 4 जणांना त्यांच्या सामानासोबत एनसीबी कार्यालयात आणण्यात आले.
रात्री 12 नंतर क्रूजवर पार्टीला सुरुवात झाली
रात्री 1 च्या सुमारास विभागीय संचालक समीर वानखडे काही हायप्रोफाइल लोकांना घेऊन दाखल झालेत. ह्यात बड्या अभिनेत्याचा मुलाचा देखील समावेश.
रात्री दीड ते दोनच्या सुमारास रात्री 11 वाजता आलेल्यांपैकी 3 जणांना सोडण्यात आले
त्याचवेळी अनेक वकीलांच्या फौजा दाखल झाल्यात. त्याचसोबत एनसीबी कार्यालयाच्या जवळपास एक लक्झरी गाडीसोबतच 5-6बाउंसर असलेली गाडी फिरत होती. बाउंसर असलेल्या गाडीकडून एनसीबी कार्यालयाबाहेर रेकी केली गेली.
रात्री 2 च्या सुमारास काही वकील एनसीबी कार्यालयाच्या आत गेलेत.
रात्री पावणे तीनच्या सुमारास वकील बाहेर पडले.
रात्री तीनच्या सुमारास आणखी एक वकीलांची टीम एनसीबी कार्यालयात दाखल
रात्री साडे तीनच्या सुमारास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखडे बाहेर पडले. त्यांच्याकडून माध्यमांना ब्रिफिंग करण्यात आलं.
रात्री 5च्या सुमारास रात्री 3 वाजता आलेली वकीलांची टीम बाहेर पडली.
सकाळी 7 वाजता मुंबई पोलिसांकडून एनसीबी कार्यालयाला बॅरिकेटिंग करण्यात आलं
सकाळी 8 वाजता एनसीबीकडून 3 महिला ज्या क्रूजवर होत्या त्यांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं.