Mumbai Murder Case: शुल्लक कारणावरुन होत्याचं नव्हतं झालं; पतीनं कैचीनं पत्नीला भोकसलं
Mumbai Murder Case: राग अनावर होऊन पतीनं पत्नीवर कैचीनं वार केले. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे.
Mumbai Murder Case: थोरामोठ्यांच्या तोंडून आपण नेहमीच रागावर नियंत्रण ठेवा, असा सल्ला हमखास ऐकतो. लहानसहान गोष्टींवरुन राग अनावर झाल्यामुळे हातून मोठ्या चुका घडल्याची उदाहरणंही आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात. अशीच एक घटना मुंबईत (Mumbai Crime) घडली आहे. मुंबईत पतीनं शुल्लक भांडणावरुन राग अनावर झाल्यानं पत्नीची कैचीनं वार करत हत्या केली आहे. मुंबईतील धारावी (Dharavi Crime News) परिसरात ही घटना घडली. पती विश्वकर्मा आपल्या पत्नीसोबत धारावी परिसरात राहत होता. दोघांमध्ये शुल्लक कारणावरुन वाद झाला. त्यातूनच राग अनावर न झाल्यामुळे विश्वकर्मानं कैचीनं वार करत पत्नीची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राग अनावर होऊन पतीनं पत्नीवर कैचीनं वार केले. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे. पतीनं कैचीनं पत्नीच्या गळ्यावर वार केले. यामध्ये पत्नीला गंभीर दुखापत झाली होती. तिला तात्काळ जवळच असलेल्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, तिचा जीव वाचू शकला नाही. उपचारा दरम्यान रेणू विश्वकर्माचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
महिलेच्या प्रियकरानं तिच्या पतीला भर रस्त्यात भोकसलं
दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील अमरोहा येथूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशात एका महिलेच्या प्रियकरानं भर चौकात महिलेच्या पतीची भोसकून हत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपीनं महिलेच्या पतीवर इतका आक्रमकपणे हल्ला केला. तेवढ्यात घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ धाव घेत, आरोपीच्या हातातून चाकू हिसकावून घेतला आणि आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपी प्रियकरावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पत्नीच्या प्रेमप्रकरणाची माहिती पतीला कळल्यावर...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत महिलेलाही दुखापत झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितलं की, दोघांचं अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ही बाब महिलेच्या पतीला कळताच त्यानं दोघांच्या नात्याला विरोध केला होता. त्यानंतर प्रियकरानं पतीची हत्या करण्याचा कट रचला होता. त्यातच त्यानं महिलेच्या पतीवर हल्ला केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :