एक्स्प्लोर

Mumbai Local Train : लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, 22 वर्षीय मयंकवर सपासप वार करून संपवलं, माथेफिरू कुर्ल्यात सापडला

Mumbai Local Train Crime : आरोपीने त्याच्या बॅगमधून चाकू काढला आणि त्याने मयंकच्या छातीवर आणि कंबरेवर अनेक वार केले. त्यानंतर आरोपी निवांतपणे चालत जात असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं. 

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये किरकोळ कारणावरून प्रवाशाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आला आहे. रोशन सुवर्णा असं या आरोपीचं नाव असून त्याला कुर्ल्यावरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या आरोपीने मयंक लोहार (Mayank Lohar) या 22 वर्षीय तरुणाची भोकसून हत्या केली होती. या प्रकरणात आता आरोपीची चौकशी करण्यात येणार असून या हत्येमागचं नेमकं कारण काय याचा तपास केला जाणार आहे.

मुंबईतल्या लोकलमध्ये एका प्रवाशाची क्षुल्लक कारणांवरुन चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी 11 वाजता जोगेश्वरी ते मालाड स्टेशनदरम्यान पावसाचं पाणी आत येत असल्यानं लोकलचा दरवाजा बंद करण्यावरुन दोन प्रवाशांमध्ये वाद सुरु झाला. वाद इतका टोकाला गेला की आरोपी रोशन सुवर्णा याने 22 वर्षीय मयंक लोहार या प्रवाशाची हत्या केली. मयंक हा विरारचा राहणारा आहे.  

Mumbai Local Train Crime : ट्रेनमध्येच चाकूने भोकसलं

लोकल ट्रेनमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने त्याच्या बॅगमधून एक मोठा चाकू काढला आणि त्याने मयंकच्या कंबरेत आणि छातीत अनेक वार केले. यावेळी ट्रेनमध्ये गर्दी असतानाही त्याला वाचवायला कुणीही गेलं नाही. त्यानंतर आरोपी हा बोरिवली स्टेशनवर उतलल्याची माहिती आहे. एक हत्या करूनही आरोपी निवांतपणे चालत जात असल्याचं सीसीटीव्हीमधून दिसत आहे. 

आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याच्या शोधासाठी लोहमार्ग पोलिसांनी सात तुकड्या रवाना केल्या होत्या. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा माग काढत त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. मयांक लोहारच्या छातीत आणि कंबरेत अनेक वेळा चाकूचे वार झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Mumbai Mayank Lohar Murder: कुटुंबीयांवर शोककळा

मृत मयंक लोहार याने फायनान्स मार्केटिंगमध्ये शिक्षण घेतलं होतं. गेल्या 9 महिन्यांपासून तो चाकाला येथील वेस्ट साइड येथे नोकरीस होता. यासाठी दररोज तो विरार ते अंधेरी असा प्रवास करायचा. लोहार कुटुंबीय मूळचे नेपाळचे असले तरी ही मुंबईतील त्यांची सहावी पिढी असल्याची माहिती आहे.  

लोहार कुटुंबीय सुरवातीला अंधेरीत वास्तव्य होते, मात्र त्यांचं घर पुनर्विकासासाठी गेल्याने गेली पाच वर्षांपासून विरार पूर्वेकडील भोईर पाडा येथे वास्तव्यास आहे. मृत मयांकला एक बहीण आणि दोन भाऊ आहेत. मयंकच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. 

ही बातमी वाचा:

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget