Mumbai ED Raid : ईडी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, दादरमधील प्रसिद्ध भरतक्षेत्र साडीच्या दुकानावर छापेमारी
Maharashtra ED Action : मुंबईच्या दादरमधील प्रसिद्ध भरतक्षेत्र साडीच्या दुकानावर ईडीची छापेमारी सुरु आहे.

Mumbai ED Raid : अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) ईडी (ED) पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. मुंबईत छापेमारी (Maharashtra ED Action) सुरु आहे. मुंबईतील प्रसिद्ध भरतक्षेत्र (Bharatkshetra) साडीच्या दुकानावर ईडीची छापेमारी सुरु आहे. दादरमधील लग्नसराईत बस्त्याच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या भरतक्षेत्र या साडी शॉपच्या दुकानावर ईडीचे छापेमारी सुरु आहे. आज सकाळी काही अधिकारी येऊन शोध मोहीम केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. अजूनही या दुकानावर छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांकडून या कारवाई संदर्भात अजून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
























