एक्स्प्लोर

Mumbai Crime: महिला वैमानिकाने CSMT वरून कॅब बुक केली, अर्ध्या तासात ड्रायव्हरची नियत बदलली, दोन मित्रांना बोलवले अन्...

Mumbai Crime: मुंबईसारख्या राजधानीच्या ठिकाणी  कॅब, टॅक्सी करून जाताना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Mumbai Crime: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी सायंकाळी एका महिला वैमानिकासोबत चालत्या कॅबमध्ये अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाने रस्ता बदलून गाडीत दोन अज्ञात व्यक्तींना बसवलं आणि त्या दोघांनी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोपी पळून गेले. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Mumbai Crime)

नेमकं घडलं काय?

मुंबईतील घाटकोपर परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, एका महिला वैमानिकासोबत चालत्या टॅक्सीमध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. पिडीत महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी सीएसएमटी परिसरात आली होती. भेटीनंतर तिने फोर्ट परिसरातून आपल्या घरी जाण्यासाठी एक कॅब बुक केली. 

अर्धा तास प्रवास झाल्यानंतर कॅब चालकाची नियत बदलली. त्याने अचानक रस्ता बदलला, ज्यामुळे महिलेला संशय आला. थोड्याच अंतरावर चालकाने गाडी थांबवली आणि कॅबमध्ये दोन अज्ञात पुरुष बसले. हे पाहून महिला अधिकच घाबरली. त्यानंतर त्या दोघांनी महिलेला धमकावत तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही अंतरावर पोलिसांची नाकाबंदी दिसल्याने चालकाने घाईघाईने गाडी थांबवली. हे पाहून दोघे आरोपी कॅबमधून उतरून पळून गेले. त्या दोघांकडे कॅब चालकाकडे चौकशी केली असता, त्याने असमाधानकारक उत्तर दिली. 

घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

घाबरलेल्या महिलेने लगेच आपल्या पतीला फोन करून संपूर्ण माहिती दिली. नंतर दोघांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या प्रकारावर पोलीस काय ॲक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  राज्यभरातून महिला अत्याचारांचे धक्कादायक प्रकार समोर येत असताना  मुंबईसारख्या राजधानीच्या ठिकाणी  कॅब, टॅक्सी करून जाताना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

वाढदिवसाच्या पार्टीत ओळखीच्या नराधमांनी घात केला

मुंबईच्या मालवणी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Mumbai Crime News) केल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे. 14 वर्षीय शाळकरी मुलीवरती एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दोन मुलांनी अत्याचार केल्याचा ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा जबाब घेऊन मालवणी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली आहे. मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी मुलीच्या ओळखीचे आहेत. 

हेही वाचा

Mumbai Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत 14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, ओळखींच्या नराधमांनी केला घात, मुंबई हादरली

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Embed widget