Mumbai Crime : चहा पिण्याच्या बहाण्याने बोलावलं अन् डोक्यात रॉड मारून संपवलं; वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्याला अटक
Mumbai Crime News : सोन्याच्या दागिन्यासाठी एका वृद्ध महिलेला संपवण्याऱ्या आणि तिच्या मृतदेहाला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्ध महिलेची हत्या केल्याप्रकरणी वडाळा पोलिसांनी (Wadala Police) एका आरोपीला अटक केली आहे. मोहमद फैज रफीक सय्यद उर्फ बाबा (27 वर्ष) असे या आरोपीचे नाव आहे. महिलेला सोन्याचे दागिने घातलेले पाहून आरोपीने तिला चहासाठी बोलावले आणि नंतर तिची आपल्या घरात हत्या केली.
मृत महिलेचे नाव सुग्राबी मुल्ला असे होते. वय 70 ते 75 वर्ष दरम्यान या वृद्ध महिलेचा मृतदेह 26 ऑक्टोबर रोजी वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला होता. या महिलेच्या डोक्यावर प्रहार केल्याचे उघड झाले होते. या महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर वडाळा पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 302 आणि 201 नुसार गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी विविध पथक तयार करून या मृत महिलेचा शोध लावला. त्यानंतर काही तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला.
सूत्रांनी, दिलेल्या माहिती प्रमाणे मयत महिला घरी जाताना एका सीसीटीव्ही मध्ये दिसून आली. मात्र, एका टप्प्यात ती दिसली नाही. पोलिसांनी त्या परिसरत पीडित महिलेची माहिती घ्यायला सुरुवात केली. चौकशीनंतर संशयित आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली.
सोन्याच्या दागिन्यांसाठी हत्या
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. महिलेच्या शरीरावरील दागिने पाहून मोह झाला. त्यानंतर या महिलेला घरी चहासाठी बोलावले. परिचित असल्याने महिला त्याच्या घरी केली. मात्र, आरोपीने तिच्या डोक्यावर रॉड मारून तिला संपवलं. त्यानंतर तिचा मृतदेह गोणीमध्ये भरला आणि घराच्या पहिल्या माळ्यावर टाकला. त्यानंतर घराबाहेर कोणी व्यक्ती नसल्याची खात्री करून त्याने गोणीत असलेल्या मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या 17 वर्षीय तरूणीवर RPF जवानाकडून बलात्कार
मागील काही काळापासून राज्यातील वातावरण महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याच्या घटना समोर येत असताना दुसरीकडे आणखी एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने (आरपीएफ) एका 17 वर्षीय मुलीला पाच दिवस डांबून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने बलात्कार केला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा (Pune Crime News) दाखल केला आहे.