एक्स्प्लोर

ठाकूर व्हिलेजमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला 12 तासात अटक, 11 तोळे सोनं आणि रोख रक्कम जप्त

Mumbai Crime: पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 11 तोळे सोने, 11 हजार रोख रक्कम आणि पाच किमती मोबाईल हस्तगत केले आहेत. 

मुंबई : शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय. अशीच चोरी करणाऱ्या एका चोरास मुंबईच्या समता नगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक करून त्याच्याकडून 11 तोळे सोने, रोख रक्कम आणि पाच किमती मोबाईलदेखील जप्त केले आहेत. सुशांत दिनेश खेडेकर (23 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर चोरीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाकूर व्हिलेज जुनापाडाच्या झोपडपट्टी परिसरात पहाटेच्या वेळी नागरिक काही कामानिमित्त, शौचालयासाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यानंतर अज्ञात व्यक्ती घरात घुसून मौल्यवान दागिने, रोख रक्कम आणि चार्जिंगसाठी ठेवलेले मोबाईल फोन घेऊन फरार झाल्या विषयीची तक्रार समता नगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. या तक्रारीवरून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करून याचा तपास गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडे सोपवण्यात आला.

तपास अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण कक्ष टीम प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन त्याचे सीसीटीव्ही फुटेज काय आहेत याची तपासणी करून तपासास सुरुवात केली. गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीवरून गुन्हे अभिलेखा वरील सुशांत दिनकर खेडेकर उर्फ सुसू हा परिसरात संशयास्पद रित्या फिरत असताना गुन्हे प्रकटीकरण कक्षाने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशी दरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेले 11 तोळे दागिने, रोख रक्कम अकरा हजार आणि पाच महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले.

समता नगर पोलिसांनी आरोपीला अटक करून या आरोपीने मुंबई शहरात आणखी कुठल्या ठिकाणी चोरी केली आहे का या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

मामाऐवजी भाच्याला संपवलं

मुंबईजवळच्या मिरा रोड या ठिकाणी सोमवारी (30 जानेवारी) झालेल्या डिलिव्हरी बॉयच्या हत्येप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून समोर आलेली बाब धक्कादायक आहे. कारण या प्रकरणात संबंधित डिलिव्हरी बॉयचा नाहक बळी गेला. मामाला मारण्याऐवजी मारेकऱ्यांनी भाच्याची हत्या केली. पेट्रोल पंपावर बाईक पुढे घेण्याच्या किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचं उजेडात आलं आहे. 

मिरा रोडच्या जांगीड सर्कलजवळ 30 जानेवारी रोजी अंकुश राजेशकुमार राज या 20 वर्षीय तरुणाची भर रस्त्यात नऊ जणांनी चाकू भोसकून हत्या केली होती. या घटनेचं सीसीटीवी फुटेजही ही व्हायरल झालं होतं. सीसीटीवी फुटेजच्या आधारे काशिमिरा गुन्हे शाखा क्रमांक 1 ने या हत्याकांड प्रकरणात नऊ जणांना अटक केली. त्यांच्यावर भादंवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या सगळ्यांची चौकशी केली असता, त्यातून समोर आलेलं कारण आश्चर्य करणारं होतं.  

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget