(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंधेरी पश्चिम म्हाडा परिसरात बंद बंगल्याववर दरोडा, वर्सोवा पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या
Mumbai Crime News: मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला परिसरातील म्हाडा कॉलनी मधील बंद असलेल्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणी वर्सोवा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षास गुन्ह्याची उकल करण्यास यश मिळाले आहे.
Mumbai Crime News: मुंबईच्या अंधेरी (Andheri) पश्चिमेकडील चार बंगला परिसरातील म्हाडा कॉलनी (mhada colony) मधील बंद असलेल्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणी वर्सोवा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षास गुन्ह्याची उकल करण्यास यश मिळाले आहे. वर्सोवा पोलिसांनी या दरोड्या प्रकरणी दोन आरोपींच्या मुस्क्या आवळल्या असून चोरांकडून तब्बल 65 तोळे सोने आणि तीन किलो चांदी इतका मुद्देमाल हस्तगत केला आहे. सूर्या मनी नाडर (21 वर्षे) व राहुल सदाशिव मुदाने (19 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चोरी गेलेल्या मालाची अंदाजे किंमत 25 लाख इतकी सांगितली जात आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा (mhada) चार बंगला येथे वास्तव्यास असणाऱ्या फिर्यादी यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे त्यांचे उत्तर कार्य करण्यासाठी संपूर्ण कुटुंबीय उत्तर प्रदेश कानपूर या ठिकाणी गेले होते याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचे गेट तोडून आणि खिडक्यांचे गज उकडून घरात प्रवेश करून घरातील तब्बल 665 ग्रॅम वजनाचे (65 तोळे) आणि तीन किलो चांदीचे दागिने चोरी केल्या संबंधीची तक्रार फिर्यादींनी वर्सोवा पोलीस ठाण्यात (versova police station) नोंदवली.
तक्रारीची दखल घेत वर्सोवा पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण कक्ष अशा दोन पथक तयार करण्यात आले गुण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी वेगाने सुरुवात केली. बंगल्याकडे चोरांनी ये जा करण्यासाठी वापरलेल्या मार्गावरील 65 ते 70 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेऊन आरोपीने वापरलेले वाहन व आरोपीचे वर्णनाची माहिती प्राप्त झाली होती. यानंतर पुढे गुप्त बातमीदारांच्या मदतीने व तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपीच्या घरांचा शोध लावला.
गुन्हा करण्यासाठी आरोपींनी वापरलेल्या मोबाईल (Mobile) आणि सायकलचा (cycle) रंग व नेमप्लेटचा आकार बदलून पोलीस पथकास चकवा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पथकाने कौशल्यपूर्ण तपास करुन सलग 5 ते 6 तास रोडवर सापळा लावून आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असता आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या आरोपी वर्सोवा पोलिसांच्या (versova police station) ताब्यात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: